सुषमानीती  :  चीनलाही केले आपलेसे  

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला घेरत जगापुढे भारताची बाजू जगापुढे समर्थपणे मांडली. सर्जिकल स्ट्राईक-२ च्या दुसऱ्याच  दिवशी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज चीन दौऱ्यावर गेल्या आहेत. चीनमध्ये १६ वी रशिया, भारत आणि चीन या देशांची (RIC) मंत्रीस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत भारताने पाकिस्‍तानचा खरा चेहरा आज पुन्हा आंतरराष्‍ट्रीय व्यासपीठावर उघडा पाडला.
… म्हणून केला सर्जिकल स्ट्राईक-२ – सर्जिकल स्ट्राईक-२ चे स्पष्टीकरण देताना सुषमा स्वराज म्हणाल्या की , पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर जैश-ए-मोहम्मद या संघटनेवर कारवाई करावी अशी मागणी भारताबरोबरच जगभरातून होत होती. जैश ए मोहम्मदने तर हल्ल्याीच जबाबदारीही घेतली होती. तरीही पाकिस्तानने ‘जैश’ विरोधात कोणतेच पाऊल उचलले नाही. आम्ही संयुक्त राष्ट्रांचे नियम पाळूनच आम्ही  जैश-ए-मोहम्मदकडून आमच्यावर होणारा संभाव्य हल्ला टाळण्यासाठी आम्ही  कारवाई केली आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यात भारताचे ४० जवान शहीद झाल्यानंतर भारताने जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांविरोधात कारवाईचे पाऊल उचलले असून आता दहशतवादाविरोधात निर्णायक कारवाई करण्याची वेळ आली असल्याचेही स्वराज यांनी ठणकावून सांगितले.
ही दहशदवाद्यांविरोधातील कारवाई , नागरिकांना ईजा नाही – 
या कारवाईदरम्यान निश्चित केलेल्या दहशतवाद्यांच्या ठिकाणांवरच लक्ष्य साधला. हे कोणतेही लष्करी ऑपरेशन नव्हते आणि कोणत्याही लष्करी ठिकाणांना निशाणा बनवण्यात आले नाही. जैशच्या तळांना उद्ध्वस्त करणे हाच या कारवाईचा उद्देश होता.मात्र या कारवाईदरम्यान, पाकिस्तानच्या कोणत्याही नागरिकाला ईजा पोहोचू नये याची काळजी घेतली गेल्याचेही त्या म्हणाल्या.  तसेच भारत अत्यंत जबाबदारीने आणि संयमाने काम करेल असा विश्वासही आंतरराष्ट्रीय समुदायाला दिला.
भारत आणि चीनमधील संबंध दोन्ही देशांसाठी खूप महत्त्वपूर्ण आहेत. गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यामध्ये झालेल्या बैठकीतनंतर दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये चांगल्या सुधारणा झाल्या आहेत, असेही स्वराज म्हणाल्या.
सर्जिकल स्ट्राइक-२ वर चीनची प्रतिक्रिया –
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी संयम राखावा , दोन देशांमधील संबंध आणि सहकार्य यांच्या आधारावरच दक्षिण आशियामध्ये शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित होऊ शकते, अशी प्रतिक्रिया सर्जिकल स्ट्राइक-२ वर चीनने दिली होती.
https://twitter.com/ANI/status/1100627610596454400