फेसबुक मित्राने घातला ५० लाखाचा गंडा

पुणे  :  पोलीसनामा ऑनलाईन

सोशल मिडीया जेवढा चांगला तेवढा घातक ही आहे. सोशल मिडीयावरुन अनेकांच्या फसवणूक झाली असताना पोलिसांकडून जनजागृती करुन या पासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात येते. मात्र, याकडे कानाडोळा करतात आणि फसवणूक झाल्यानंतर पोलिसांकडे धाव घेतात. तोपर्य़ंत आरोपी पसार होतात. असाच एक प्रकार पुण्यातील शंकरशेठ रोडवर राहणाऱ्या व्यक्तीच्या बाबतीत घडली आहे. या व्यक्तीला फेसबुक मित्रानेच ४७ लाख ७ हजार ८०० रुपयांना फसवले.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ae956b70-c973-11e8-80e7-ed1641d2a3fd’]

याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात अॅलिथिया स्मिथ (रा. अमेरिका), कस्टम ऑफिसर (दिल्ली) आणि चार मोबाईल धाराकांविरुद्ध माहीत तंत्रज्ञान कायद्या अंतर्गत फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. एका ५९ वर्षीय व्यक्तीने याप्रकरणी फिर्य़ाद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी अँलिथिया स्मिथ यांची फेसबुकवर मैत्री झाली.  स्मिथ या महिलेने फिर्यादी यांना रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याचे अमिष दाखवले. दरम्यान, आरोपी महिलेने फिर्य़ादी यांना फोन करुन आपण तुम्हाला भेटण्यासाठी भारतात आलो असल्याचे सांगितले. तसेच भारतात येत असताना काही सोने आणले आहे. मात्र, हे सोने दिल्ली विमानतळावरील कस्टमच्या अधिकाऱ्यांनी पकडले असल्याचे सांगून त्यांच्याकडे आर्थिक मदत मागितली. तिच्या सांगण्यावरुन फिर्यादी यांनी ४७ लाख ७ हजार ८०० रुपये आरोपी स्मिथ यांनी सांगितलेल्या विविध खात्यामध्ये ऑनलाईन स्ट्रान्सफर केले. यानंतर फिर्य़ादी यांनी स्मिथ हिच्याशी संपर्क साधण्याच प्रयत्न केला मात्र होऊ शकला नाही. आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) एम.आर. पंडीत करित आहेत.

[amazon_link asins=’B00HT03SJY,B007E9INFO’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d02e0933-c973-11e8-b090-09a11a6b3705′]

बुधवार पेठेत दोन दुकानात घरफोडी

पुणे  :   बुधवार पेठेतील दोन दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी दुकानातील ३४ हजार रुपयांची रोकड चोरून नेली. याप्रकरणी खलील उर रेहमान फजलू रेहमान (वय-३४ रा. रविवार पेठ) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे बुधवार पेठेत फॅब्रिक वर्ल्ड नावाचे दुकान आहे. चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून दुकानातील ड्रॉव्हरमध्ये ठेवलेले ३० हजार रुपयांची रोकड चोरुन नेली. तसेच किरण वणवे यांचे सलुनचे दुकानाचे शटर उचकटून ४ हजार रुपयांची रोडक चोरुन नेली. हा प्रकार शुक्रवारी (दि.५) सकाळी पावणे सातच्या सुमारास उघडकीस आला. पुढील तपास विश्राबाग पोलीस करीत आहेत.

गुन्हे शाखेने अट्टल वाहन चोरांच्या आवळल्या मुसक्या, २० दुचाकी जप्त