मुंबईतील स्फोटकांसह कार प्रकरणाची चौकशी NIA ला द्यावी; देवेंद्र फडणवीसांची मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  राज्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुन्हेगारीच्या मुद्यावरुन महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. तर मुंबई येथे २६ तारखेला जिलेटीनने भरणारी कार सापडली. ही कार आली कुठून? याचा शोध घेतला पाहिजे. तर या प्रकरणाची चौकशी एनआयएला द्यावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी केली आहे.

दरम्यान, फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल करत म्हटलं आहे की, या प्रकरणात ठाण्यातील मनसुख मिश्रीलाल हिरेन यांनी कार चोरी झाल्याची तक्रार केली होती. मात्र हीच स्कॉर्पिओ कार पेडर रोडला सापडली. यानंतर एक पत्र जैश उल हिंदच्या नावाने आलं. जैश उल हिंदने या घटनेशी आपला काही संबंध नाही, असं सांगितलं. तर या संघटनेने भारतीय गुप्तचर यंत्रणांनी खोटे पत्र आणि खोटे टेलिग्राम अकाऊंट असल्याचं सांगितले अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली आहे.

तसेच पुढे ते म्हणाले, या ठिकाणी तेथे दोन्ही गाड्या ठाण्याहून आल्या होत्या. तिथे मुंबई पोलीस दलाचे सचिन वझे पोहोचले. सचिन वझेंना का काढलं हे मला माहिती नाही. माझ्याकडे सीडीआर आहे हिरेन आणि सचिन वझे यांचे फोन संभाषण आहे. हे दोघेही ठाण्याला राहतात. ते ओलाला बसून क्रॉफर्ड मार्केटला गेला, तिथे त्याला तो भेटला. त्या ओलाच्या ड्रायव्हरला हा माणूस कोण भेटला हे माहिती आहे. गाडी सापडल्यावर तिथे वझे पोहोचले. ते धमकीचं पत्रही वझेंना मिळालं. मग एक टेलिग्राम संदेश येतो आणि ती संघटना या प्रकरणाशी काही संबंध नाही, असे सांगतील जातं. या प्रकरणात बराच संशय आहे. असं त्यांनी म्हटलं आहे.