45 वर्ष जुने ब्रँड Fair and Lovely चे नाव बदलणार Hindustan Unilever

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोठी एफएमसीजी कंपनी एचयूएल (हिंदुस्तान युनिलिव्हर) फेअर अँड लवली या ब्रँडचे नाव बदलण्याची योजना आहे. कंपनीने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, सर्व मंजुरी मिळाल्यानंतर नवीन ब्रँड नेम लाँच केले जाईल. फेअर अँड लवली मधून फेअर हा शब्द काढून टाकण्याचे कंपनीने म्हटले आहे. नवीन स्वरूपात आगामी फेअर अँड लवली ब्रँड वेगवेगळ्या स्किन टोन असलेल्या महिलांच्या प्रतिनिधीत्वावर अधिक केंद्रित असेल.

४५ वर्षांपूर्वी सुरु झाली होती फेअर अँड लवली
१९७५ मध्ये हिंदुस्तान युनिलिव्हरने ‘फेअर अँड लवली’ नावाची फेअरनेस क्रीम लाँच केली. देशातील फेअरनेस क्रीम मार्केटमध्ये ५०-७० टक्के वाटा ‘फेअर अँड लवली’चा आहे. “फेअर अँड लवली”ने २०१६ मध्ये २००० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला, ज्यावरून असे दिसून येते की भारतात फेअरनेस क्रिम खूप विकली जाते.

का घेतला नाव बदलण्याचा निर्णय?
जागतिक ग्राहक कंपनी युनिलिव्हरची भारतीय सहायक कंपनी हिंदुस्तान युनिलिव्हरने म्हटले आहे की, ते आपल्या स्किन क्रीमचे रिब्रॅंडिंग करणार आहेत. कंपनीवर कित्येक दशकांपासून त्वचेचा रंग आणि गडद त्वचेसाठी गैरवर्तन झाल्याचा आरोप आहे आणि त्यानंतर आता अखेर कंपनीने हा निर्णय घेतला आहे.

आता काय असेल नाव?
हिंदुस्तान युनिलिव्हरने म्हटले आहे की, कंपनी आपल्या ब्रँडच्या नावात फेअर हा शब्द वापरणे बंद करणार आहे. त्यांनी नवीन नावासाठी अर्ज केला आहे, त्यासाठी नियामक मान्यता अद्याप मिळालेली नाही, असेही कंपनीने म्हटले आहे.

एका वृत्तसंस्थेनुसार, दक्षिण आशियातील युनिलिव्हर स्किन लाइटनिंग क्रीमची मार्केटिंगमध्ये बदल करण्याची तयारी करत आहे. कारण सोशल मीडियावर आणि इतरत्र फेअरनेस क्रीम विरोधात निषेध सुरू आहे.

तज्ञांचे म्हणणे आहे की, हा निर्णय कंपनीसाठी तणावपूर्ण असेल. कारण याचा परिणाम विक्रीवर होईल. या पावलामुळे येत्या काही दिवसांत कंपनीची विक्री कमी होऊ शकते. परिणामी त्याचा उत्पन्नावरही नकारात्मक परिणाम होईल. मात्र लॉन्ग टर्ममध्ये हा निर्णय कंपनीच्या हितासाठी उपयुक्त ठरेल.