केंद्र सरकारव्दारे दिल्या जाणारे हेल्थ आयडी बनवण्यासाठी लागणार फक्त ‘ही’ कागदपत्रे, PIB नं दिली माहिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही असं काहीतरी वाचलं असेल की केंद्र सरकारद्वारे बनवण्यात येणाऱ्या हेल्थ आयडीसाठी तुम्हाला वैयक्तिक माहिती द्यावी लागेल, जसं की पॉलिटिकल व्यू, जात, मेडिकल हिस्ट्री अशी माहिती देण्याचा कोणताही नियम सरकारने बनवला नाही. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका.

– प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने अशी माहिती दिली की सरकार नागरिकांकडून अशा प्रकारची कोणतीही माहिती मागवत नाही.

– Ayushman Bharat नुसार आता सरकारी आणि जवळच्या हॉस्पिटल्सना मिळणार स्टार रेटिंग.

– PIB ने फॅक्ट चेक करून ट्विट केलं की मीडिया रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की सरकार हेल्थ आयडी बनवण्यासाठी वैयक्तिक माहिती मागवत आहे तर ते खोटं आहे.

– हेल्थ आयडी बनवण्यासाठी फक्त नाव, जन्म वर्ष, राज्य इत्यादी माहिती भरावी लागणार आहे.