… म्हणून २ हजारांची नोट घेताना तपासून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानंतर ८ नोव्हेंबर २०१६ तारखेला आरबीआयने नोटबंदी करत नोटांमध्ये काही बदल केले होते. त्यात नव्या १० रुपयाची नोट, १०० रुपयाची नोट आणि २ हजाराची नोट बाजारात आली होती. त्यानंतर २ हजारच्या नोटा सर्वाधिक लोकांच्या पसंतीस पडल्या होत्या. त्यामुळे अनेक २ हजारांच्या नोटा बाळगतात. मात्र आता २ हजारच्या नोटा ठेवणाऱ्यांसाठी मोठी सूचना आली आहे.

आलेली सूचना ही २ हजारांच्या नकली नोटांबाबत आहे. भारताचा शेजारील देश म्हणजे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेची अवस्था बिकट आहे. त्यात पाकिस्तान भारतीय २ हजारांच्या नकली नोटांची छपाई करून भारतीय अर्थव्यवस्थेला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. पाकिस्तान या २ हजाराच्या नोटा छपाई करून भारतात पाठवत आहे. या गोष्टीवर लोकसभेत सरकारनेही खरे असल्याचे कबुल केले आहे.

नकली नोटांचे जाळे नष्ट करण्यासाठी भविष्यात २ हजारांची नोट बंद करण्यासंदर्भात सरकारला प्रश्न विचारण्यात येत आहेत. मात्र सध्या असा कोणताही प्रस्ताव नाही. त्यामुळे आपण कोणाकडून २ हजाराची नोट घेण्यापूर्वी ती नीट पारखून घेणे आवश्यक आहे.

आरोग्यविषयक वृत्त –