गर्भवती महिलेचा मुलासह छतावरून पडून मृत्यू

शिर्डी : पोलीसनामा ऑनलाईन-शिडीर्तील गणेशवाडी भागात इमारतीच्या तिस-या मजल्यावरुन पडून गर्भवती आई आणि चार वर्षाच्या मुलाचा दुर्देवी अंत झाल्याची घटना आज घडली. हा घातपात असल्याचा संशय मयत वैशाली साईदास शिंदे यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.

आज दुपारच्या सुमारास गर्भवती असलेली वैशाली शिंदे आणि मुलगा अथर्व शिंदे घराच्या छतावरून खाली पडलेल्या अवस्थेत आढळल्या. स्थानिक नागरिकांनी दोघांनाही साईबाबा संस्थानच्या साईबाबा रुग्णालयात उपचारासाठी आणले. हॉस्पिटल मधील डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषीत केले आहे.

मयत वैशालीचा घातपात झाल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला असुन या प्रकरणाची चौकशी होऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी मयत वैशालीचे नातेवाईक करत आहे.

गावठी कट्टा बाळगणाऱ्या चौघांना अटक

अहमदनगर : विनापरवाना देशी बनावटीचे पिस्तुल बाळगणाऱ्या चौघांना शनिवारी पोलिसांनी अटक केली. यातील दोघांना कोतवाली पोलीसांनी शहरातील बुथ हॉस्पिटलसमोरून, तर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोघांना बुरुडगल्ली येथून अटक केली. कोतवाली पोलिसांनी अरशाद रशिद सय्यद (वय २२रा. फकिरवाडा दर्गा समोर, नगर) व फरमान जाकीर सय्यद (२४ रा. मुकुंदनगर) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

या दोघांकडून पोलिसांनी मेड इन जपान बनावटीचे पिस्टल, ६ जिवंत राऊंड व एक मोटारसायकल असा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस निरीक्षक नितीन गोकावे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक शिवाजी नागवे, पोलीस हेड कॉन्स्टेबल रायचंद पालवे, पोलीस नाईक शरद गायकवाड, शाहिद शेख, नितीन गाडगे यांच्या पथकानेही ही कारवाई केली.  शहरातील बुरूडगल्ली येथील धरती चौक येथे गावठी कट्टा विक्रीसाठी आलेल्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले.

राहुल राजेंद्र पवार (वय ३५ रा.  खळवाडी ता. नेवासा) व संदेश शिमोण निकाळे (वय २६ रा. धरती चौक) असे ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत.  यावेळी श्रीकांत उर्फ बच्चू शिरसाठ हा फरार झाला. ताब्या घेतलेल्या दोघांकडून ६१ हजार रूपये किमतीचे देशी बनावटीचे दोन गावठी पिस्तोल व ६ जिवंत काडतूस असा मुद्देमाल जप्त केला. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश फडतरे, मन्सूर सय्यद, शंकर चौधरी, रवींद्र कर्डिले, मनोहर गोसावी, दत्ता गव्हाणे, सचिन अडबल यांच्या पथकाने कारवाई केली.