गर्लफ्रेन्डचा खून करून खाल्लं तिचं मांस, ‘त्या’ नरभक्षीला तुरूंगातून सोडण्यावरून ‘वादंग’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गर्लफ्रेंडची हत्या करणाऱ्या एका व्यक्तीला तुरुंगातून सोडून देण्यात आल्यामुळे मोठे वादळ निर्माण झाले आहे. ब्रिटनमधील 60 वर्षीय पॉल दुरंत याने 2004 मध्ये आपल्या गर्लफ्रेंडची स्पेनमध्ये हत्या केली होती. त्यानंतर त्याने आणि त्याच्या मित्राने तिचे मांस खाल्ल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली होती.

त्यानंतर त्याला या प्रकरणात स्पेनमध्ये शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर त्याने 2010 पासून उर्वरित शिक्षा ब्रिटनमध्ये भोगली. ब्रिटनमध्ये त्याला लुटमारीच्या घटनेत देखील शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर आता त्याला तुरुंगातून सोडून देण्यात आले असून तो पूर्व लंडनमध्ये सध्या वास्तव्यास आहे. ड्रग्जच्या आहारी गेलेल्या पॉलने 2004 मध्ये त्याच्या गर्लफ्रेंडची हत्या केली होती. त्यावेळी त्याला पोलीस आणखी काही प्रकरणांत देखील शोधत होते. त्यामुळे त्याने या महिलेच्या घरी शिफ्ट होत तिच्याबरोबर राहू लागला. त्याच्या गर्लफ्रेंडने नवऱ्यापासून घटस्फोट घेतला होता. त्यामुळे आता तिच्या कुटुंबीयांनी त्याला तुरुंगातून सोडून देण्यात आल्यानंतर प्रतिक्रिया दिली असून त्याला सोडून देणे धोकादायक असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर त्याला अशा प्रकारे तुरुंगातून सोडून देणे धोकादायक असल्याचे देखील म्हटले आहे.

दरम्यान, गर्लफ्रेंडची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला नव्हता. त्यावेळी पोलिसांनी तिच्या घरात छापा टाकला असताना केवळ रक्ताचे डाग आणि चाकू पोलिसांच्या हाती लागला होता.

आरोग्यविषयक वृत्त –

Loading...
You might also like