मयत बँक कर्मचाऱ्याचा ‘कोरोना’ अहवाल निगेटिव्ह, शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथील खळबळजनक घटना

शिक्रापूर : पोलीसनामा ऑनलाइन – शिरुर तालुक्यातील शिक्रापूर येथील एका बँकेमध्ये नोकरीला असलेल्या आणि शिक्रापूर शेजारील एका गावातील रहिवाशी असलेल्या एका व्यक्तीला काही त्रास होत असल्याने त्याचा कोरोना अहवाल २० ऑगस्ट रोजी तपासणीसाठी पाठविण्यात आलेलें होता मात्र रात्री उशिरा जास्त त्रास होऊ लागल्याने त्याला शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयात एका घेऊन जात असताना त्याचा मृत्यू झाला त्यांनतर सर्व काही कोरोना संशयित म्हणून अंत्यसंस्कार करण्यात आले मात्र दुसऱ्या दिवशी सदर मयत व्यक्तीचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याने कुटुंबियांना दिलासा मिळाला आहे.

शिक्रापूर ता. शिरूर शेजारील एका गावातील रहिवाशी असलेल्या आणि शिक्रापूरातील मोठ्या बँकेमध्ये नोकरीला असलेल्या एका व्यक्तीला काही त्रास होत त्यामध्ये कोरोनाची लक्षणे जाणवत असल्याने त्याचा कोरोना अहवाल २० ऑगस्ट रोजी तपासणीसाठी पाठविण्यात आलेला होता, त्यांनतर रात्री उशिरा त्याला जास्त त्रास होत असल्याने नातेवाइक त्याला शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयात घेऊन जात असताना अचानकपणे त्याचा मृत्यू झाला यावेळी सार्वजन गोंधळून गेले, परंतु सदर इसम कोरोना संशयित असल्याने त्याचे शवविच्छेदन करणे देखील शक्य नव्हते, त्यांनतर शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. वैजिनाथ काशीद यांनी शिक्रापूर ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी बि. बि. गोरे यांना माहिती दिली असता बाजार समितीचे संचालक आबाराजे मांढरे यांच्या मदतीने शिक्रापूर ग्रामपंचायत कर्मचारी गणेश गायकवाड, गणेश राऊत, बबलू शेख, योगेश केवटे, प्रसाद वाडेकर, पप्पू चव्हाण, गणेश भुजबळ, चंद्रकांत वाबळे, तुळजाराम माने यांनी सर्व खबरदारी घेत सदर मृतदेहावर अंत्यसंस्काराची प्रक्रिया पूर्ण करत मयतावर अंत्यसंस्कार केले.

त्यांनतर सदर मृत व्यक्तीच्या संपर्कातील काही व्यक्तींचे देखील अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आले आणि शिक्रापूर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी अंत्यविधीसाठी पुढाकार घेतल्याने अंत्यसंस्कार करणाऱ्या काही काही ग्रामपंचायत कर्मचारी यांना होम क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता, मात्र २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी सदर मृत व्यक्तीचा कोरोना अहवाल प्राप्त झाला आणि त्याचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आणि मयत व्यक्तीच्या नातेवाईकांसह सर्वांना दिलासा मिळाला आहे.