कुख्यात बॅग लिफ्टर अलंकार पोलिसांच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

अलंकार पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये बॅग लिफ्टींग, चेनचोरी करणाऱ्या कुख्यात तडीपार गुन्हेगाराला अलंकार पोलिसांनी अहमदनगर येथे सापळा रचून अटक केली. तपासा दरम्यान पोलिसांनी त्याच्या साथिदाराला पुण्यातून अटक केली आहे. आरोपींकडून बॅग लिफ्टींगचे ३ तर चेनचोरीचे ४ गुन्हे उघडकीस अणून ३ लाख ८ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
[amazon_link asins=’B0784BZ5VY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’49e056a2-adf2-11e8-be63-b905f2db3dca’]

समीर हज्जु पठाण (वय-२७ रा. सुयोगनगर, वारजे माळवाडी, पुणे), राहुल गजेंद्र कांबळे (वय-१९ रा. पानमळा, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. समीर पठाण हा कुख्यात गुन्हेगार असून तो त्याचा साथिदार राहुल कांबळे याच्या मदतीने गुन्हे करीत होता.

चोरीच्या गुन्ह्याचा तपास करीत असताना तांत्रीक माहितीच्या आधारे समीर पठाण हा अहमदनगर येथे असल्याची माहिती अलंकार पोलिसांना मिळाली. अलंकार पोलीस ठाण्यातील तपासी पथकाने नगर येथे जाऊन पठाणला सापळा रचून अटक केली. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने हे गुन्हे राहुल कांबळे याच्या मदतीने केले असल्याचे कबुल केले. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी ३ बॅग लिफ्टींग आणि ४ चेनचोरीचे गुन्हे केल्याचे कबुल केले. पोलिसांनी त्यांच्याकडून १ मोबाईल, १०३ ग्रॅम सोन्याचे दागिने, गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण ३ लाख ८ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.
[amazon_link asins=’B0756RF9KY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5064bc4d-adf2-11e8-bfe5-2fc6eac721c3′]

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त दक्षिण प्रादेशिक विभाग रविंद्र सेनगावकर, परिमंडळ – ३ चे पोलीस उपायुक्त मंगेश शिंदे, सिंहगड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त बाजीराव मोहीते, अलंकार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्पना जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) भास्कर जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदिप बुवा, पोलीस कर्मचारी तन्वीर शेख, बाबुलाल तांदळे, राजेंद्र लांडगे, योगेश बडगे यांच्या पथकाने केली.

दि.13 जानेवारी ते 31 ऑगस्ट 2018 या कालावधित 28 लाख 50 हजाराची व्हीव्हरशिप मिळवलेल्या Policenama News या चॅनेला Subscribe करा.

Policenama News