फार्मासिस्टची अत्यावश्यक सेवेत लढाई सुरू

पुणे : प्रतिनिधी कोरोना व्हायरसचा संसर्ग रोणख्यासाठी मागिल दीड महिन्यापासून देश लॉकडाऊन केला आहे. पोलीस, डॉक्टर आणि त्यांच्याशी निगडित सर्व स्टाफ अत्यावश्यक सेवेमध्ये गनला गेला आहे. त्यामध्ये फार्मासिस्टसुद्धा तेवढाच महत्त्वाचा घटक आहे, हे विसरून चालणार नाही. कोरोना महामारीच्या संकटात फार्मासिस्टचासुद्धातेवढाच पुढाकार घेऊन देशासाठी महत्त्वाचे योगदान देत आहेत.

फार्मासिस्टला सरकारी नोकरीमध्ये इतर क्षेत्रापेक्षा दुय्यम स्थान दिले जात आहे. त्यामुळे फार्मासिस्ट, डिप्लोमा, डिग्री आणि मास्टर डिग्री मिळविलेल्या विद्यार्थ्यांची कुचंबना होत आहे. शासकीय आणि निमशासकीय सेवेमध्ये इतर क्षेत्रातील उमेदवारांना स्थान दिले जाते, तेवढेच स्थान फार्मासिस्टलासुद्धा असणे अत्यंत गरजेचे आहे.

आज देशभर नव्हेतर जगभर कोरोनाशी लढाई सुरू आहे. या लढाईमध्ये फार्मासिस्टचे मोठे योगदान आहे. हॉस्पिटल, मेडिकल, औषध निर्माण करणाऱ्या कंपन्यांमध्ये 24 तास कार्यरत आहेत. सरकारने आता तरी कोरोनाच्या लढाईमध्ये पडद्यामागे काम करणाऱ्या फार्मासिस्टसाठी विमा संरक्षण देण्याची गरज आहे.

परदेशामध्ये डॉक्टर आणि फार्मासिस्टना सारखेच स्थान आहे. त्यामुळे ही दोन्ही एकाच रथाची दोन चाके मानली जात आहेत. औषध निर्मिती झाल्यानंतर ते औषध कोणत्या आजारासाठी किती आणि कशे उपयुक्त ठरेल, याची माहिती देण्यासाठी फार्मासिस्ट एम.आर. डॉक्टरांकडे जातात. त्याचे परिणाम कसे चांगले आहेत, याविषयी तासनतास वाट पाहून सांगतात. अनेक वेळा डॉक्टर वेळ देत नाहीत, तरीसुद्धा न चिडता, शांतपणे पुन्हा डॉक्टरांची वेळ घेतात आणि त्यांना नवनवीन औषधांविषयी माहिती देण्यासाठी धडपड करीत असतात. दिवसभर उन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता धावपळ करतात.

मागिल काही महिन्यापूर्वी ईएसआयसी (एम्प्लॉइज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन)मध्ये फार्मासिस्टच्या रिक्त जागा भरावयाच्या होत्या. राज्यस्तरीय भरती असून, त्याचे नियोजन केंद्रस्तरावरून केले गेले. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही. परीक्षेसाठी दोन सेंटर निवडण्याची परवानगी परीक्षा विभागाने दिली होती. मात्र, परीक्षा केंद्र निवडलेले न देता परराज्यातील केंद्र देऊन विद्यार्थ्यांचा गोंधळ उडवून दिला होता. याविषयी वृत्तपत्रात बातम्या छापून आल्या, तरी तरीही प्रशासनाने दखल घेतली नाही. आता भविष्यात तरी प्रशासनाने अशा पद्धतीने परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा गोंधळ होणार नाही, याची दखल घेणे आवश्यक आहे. फार्मासिस्टसाठीची रिक्त पदे तातडीने भरावीत, त्यासाठी राज्य व केंद्र शासनाने लक्ष घालून फार्मासिस्ट उमेदवारांना न्याय दिला पाहिजे.

– अश्विनी मनोज बालगुडे, हडपसर-पुणे.