शेतकऱ्याने पत्नीचा खून करून केली आत्महत्या

शिराढोण (उस्मानाबाद ) : पोलीसनामा ऑनलाईन

शेतात काही पिकत नाही, कुक्कुट पालन व्यवसायात आलेले अपयश यातून आलेले आर्थिक संकटामुळे शेतकऱ्याने पत्नीचा खून करुन स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली. शेतकऱ्याने पत्नीच्या डोक्यात हातोड्याने वार करुन खून केला. ही घटना आज पहाटे उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंबा तालुक्यातील शिराढोण येथे घडली. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’699da12f-cee9-11e8-bd96-ef260606ce1a’]

कळंब तालुक्यातील शिराढोण येथील रामभाऊ गुलाब यादव (वय-५५) यांना गावच्या शिवारात तीन एकर शेती आहे़ रामभाऊ यादव व त्यांच्या पत्नी सिताबाई यादव हे शुक्रवारी रात्री शेतातील कुकुटपालन शेडमध्ये झोपले होते. आज पहाटेच्या सुमारास रामभाऊ यादव यांनी पत्नी सिताबाई यादव (वय-५०) यांच्या डोक्यात हातोडीने वार करून खून केला. सिताबाई यांचा खून केल्यानंतर रामभाऊ यादव यांनी तेथून जवळच असलेल्या बाभळीच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली.

बलात्कार प्रकरणातील आरोपीला मदत करणाऱ्या पोलीस निरीक्षकाला अटक

घटनेची माहिती मिळताच शिराढोण पोलीस, ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, सततच्या नापिकीमुळे यादव यांच्यासमोर आर्थिक चणचण राहत होती. त्यातच त्यांनी सुरू केलेल्या कुक्कुट पालन व्यवसायातही त्यांना यश आले नव्हते. आर्थिक विवंचनेमुळे आलेल्या नैराश्येतून यादव यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे नातेवाईकांनी सांगितले. मयत यादव दाम्पत्याच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. मयताच्या पार्थिवाचे शिराढोण प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी शिराढोण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

[amazon_link asins=’B01F7AX9ZA,B072XP1QB7′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’cdb24952-ceeb-11e8-960e-69c92a4b5b13′]