FASTag ने होतात अनेक फायदे ! आता कॅशलेस आणि कॉन्टॅक्टलेस पेट्रोल भरण्यासाठी सुद्धा होईल मदत, जाणून घ्या सर्वकाही

0
69
fastag has many benefits now it will also help in filling cashless and contactless petrol know everything
FASTag

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – FASTag ने भारतातील काही निवडक पेट्रोल पम्पावर सर्वात वेगवान कॅशलेस आणि कॉन्टॅक्टलेस इंधन भरण्याचा दावा केला आहे, ज्यासाठी FASTag ने इंडियन ऑईल कॉर्पोरेशनसोबत भागीदारी केली आहे. फास्टॅग यूजर्स, ज्यांचे खाते आयसीआयसीआय बँक खात्याशी जोडलेले आहे, त्यांना देशरात Indian Oil च्या रिटेल आऊटलेट्सवर बेनिफिट्स दिले जातील.

रविवारी जारी केलेल्या वक्तव्यात म्हटले आहे की, आयसीआयसीआय बँक FASTag यूजर्स आता Indian Oil च्या इंधन स्टेशनवर पूर्णपणे डिजीटल अनुभवाचा आनंद घेऊ शकतात. यामध्ये यूजर्सचा वेळदेखील वाचणार आहे.

Indian Oil च्या इतक्या आऊटलेटवर मिळेल सुविधा – वक्तव्यानुसार, पहिल्या टप्प्यात भारतात जवळपास 3,000 Indian Oil रिटेल आऊटलेट्स कव्हर केले जातील. ही सिस्टम इंडियन ऑईलच्या ऑटोमेशन सिस्टमसोबत काम करेल, जी इंधन भरण्याच्या प्रक्रियेदरम्यान कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप दूर करते. ही भागीदारी आयसीआयसीआय बँक FASTag च्या माध्यमातून पेट्रोल, डिझेल आणि लुब्रिकेंट्सच्या पेमेंटची परवानगी देते.

या सुविधेचा लाभ घेण्यासाठी यूजर्सला इंधन भरताना ग्राहक सेवकाला सूचित करावे लागेल,
जो नंतर वाहनाचा FASTag/कार नंबर प्लेट स्कॅन करेल.
ज्यानंतर ग्राहकाला इंधन भरण्यासाठी एक OTP पाठवला जाईल.
POS मशीनमध्ये OTP नोंदल्यानंतर व्यवहाराची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

Web Title :- fastag has many benefits now it will also help in filling cashless and contactless petrol know everything

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Raj Kundra Arrested | अश्लिल चित्रपट प्रकाशित प्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक

Uddhav Thackeray | कोरोनाचे संकट नष्ट होऊ दे ! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घातले पांडुरंगाला साकडे

Porn apps Case | पॉर्न व्हिडीओ बनवून अपलोड केल्याप्रकरणी राज कुंद्रा आधी ‘या’ अभिनेत्रीला झाली होती अटक

Supreme Court | महाराष्ट्र सरकारला उपचाराचे दर ठरवण्याचा अधिकार नाही