फायद्याची गोष्ट ! इथं ‘फास्टॅग’ फक्त 100 रूपयांना, वाहनाला लावला नाहीतर ‘दुप्पट’ टोल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 1 डिसेंबर 2019 पासून कोणत्याही टोलनाक्यावर टोल वसूली कॅशमध्ये केली जाणार नाही. कारण आता फास्टॅगच्या मदतीनं टोल भरायचा आहे. फास्टॅग हे एक रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन डिव्हाईस आहे. देशभरात आता फास्टॅगच्या माध्यमातून टोलवसूली केली जाणार आहे.

फास्टॅग नसल्यास दुप्पट टोल
महामार्ग वाहतूक मंत्रालयानं म्हटलं आहे की, 1 डिसेंबरपासून जर कोणती गाडी टोलनाक्यावरून जात असेल तर त्यासाठी फास्टॅग सक्तीचा आहे. जर फास्टॅग नसेल तर दुप्पट टोल वसूल केला जाणार आहे.

कुठे मिळतो फास्टॅग ?
तुम्हाला फास्टॅग खरेदी करायचा असेल तर त्याची किंमत 100 रुपये आहे. याशिवाय तुमच्या गाडीप्रमाणे तुम्हाला वेगळा चार्जही द्यावा लागेल. यासाठी तुम्हाला एसबीआय बँकेत जाऊन पॉईंट ऑफ सेलवर जावं लागेल. इथे तुम्हाला एक फॉर्म दिला जातो. हा फॉर्म भरून KYC डॉक्युमेंटची फोटोकॉपी द्यावी लागेल. यात तुमच्या गाडीची RC, एक ID प्रूफ, अ‍ॅड्रेस प्रूफ आणि फोटो द्यावा लागेल.

फास्टॅग रिचार्ज करणं सोपं
तुम्ही फास्टॅगला एसबीआयच्या अधिकृत वेबासईटवरून रिचार्ज करू शकता. वेबासाईटवर जाऊन तुम्हाला फास्टॅग सेक्शनवर क्लिक करावं लागेल. यात आधी तुम्हाला मोबाईल नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा एन्टर करून लाॅग इन करावं लागेल. यानंतर तुमच्या गाडीचा पर्याय निवडा. यानंतर रिचार्ज अमाऊंट टाका. यानंतर पेमेंट ऑप्शन निवडून फास्टॅग रिचार्ज करा.

टोलनाक्यावर टोल भरताना अनेक गाड्यांची भली लांबवर रांग असते. याशिवाय टोल भरताना वेळही बराच जातो. त्यामुळेच गाडीला फास्टॅगची सोय लावण्यात आली आहे. 1 डिसेंबर पासून फास्टॅग आता सक्तीचा असणार आहे. तसे नसल्याचं टोलही दुप्पट भरावा लागणार आहे. त्यामुळे वेळ आणि पैसे वाचवायचे असताील तर गाडीला फास्टॅग लावून घ्या.

Visit : Policenama.com