दारूड्या बापाने लोखंडी गज डोक्यात घालून मुलाचा केला खून  

शेवगाव : पोलीसनामा ऑनलाईन – जन्मदात्या दारुड्या बापाने लोखंडी गज डोक्यात घालून  पोटच्या मुलाचाच खून केल्याची खळबळजनक उघडकीस आली आहे. आखेगाव येथे मंगळवारी (दि. 30) पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली.  याप्रकरणी वडिलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमनाथ गोरख करपे (वय-18) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. गोरख किसन करपे असे गुन्हा दाखल केलेल्या वडिलाचे नाव आहे.  याप्रकरणी पत्नी ताराबाई करपे पती विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमनाथ हा मंगळवारी पहाटे शेतात उसाला पाणी देत होता. त्यावेळी गोरख करपे याने सोमनाथच्या डोक्यात लोखंडी गजाने वार करून खून केला. गोरख हा दारूच्या आहारी गेल्याने घरात कायम वाद होत असत. सोमवारी (दि. 29) गोरख दारू पिऊन घरी आला. यावेळी पत्नी ताराबाईने  आज होळीचा सन असुनही तुम्ही दारू का पिऊन आला, अशी विचारणा केली. त्यावर  रागावलेला गोरख पत्‍नीला मारण्याकरीता पुढे आला, पंरतु मुलगा सोमनाथ मध्ये आल्याने तिचा मार वाचला. त्यावेळी गोरखने मुलाला शिवीगाळ केली व तो घरातून निघून गेला. त्यानंतर ताराबाई व मुलगा सोमनाथ हे दोघे जेवन करुन रात्री 10 च्या सुमारास त्यांच्या शेतात ऊसाला पाणी देण्यासाठी गेले. त्यांच्या पाठोपाठ गोरख हा देखील शेताकडे गेला. पहाटे तीनच्या सुमारास गोरखने मुलगा सोमनाथच्या डोक्यावर लोखंडी गजाने वार केला. यात तो गंभीर जखमी झाल्याने  जागेवरच पडला. ही घटना समजल्याने शेजारीच पिकाला पाणी देत असलेले इतर शेतकरी घटनास्थळी धाव घेत जखमी सोमनाथला नगर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.  तपास पोलिस उपनिरीक्षक सुजित ठाकरे करीत आहेत.