Advt.

FDA | FDA ची धडक कारवाई, पुणे विभागात 34 औषध दुकानांना ठोकले टाळे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – फार्मासिस्ट (Pharmacist) उपस्थितीत नसताना औषधांची (Medicine) विक्री करणाऱ्या 34 दुकानदारांवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धडक कारवाई केली आहे. फार्मासिस्ट नसताना औषधांची विक्री करणाऱ्या 34 दुकानांना एफडीए (FDA) ने टाळे ठोकले आहे. एफडीएने केलेल्या तपासणीच्या प्रमाणात कोल्हापूरमध्ये सर्वाधिक औषध दुकानांना ‘स्टॉप सेल’ची नोटीस (Stop sale notice) बजावण्यात आली असून पुणे जिल्हा (Pune District) तिसऱ्या क्रमांकावर आहे.

औषध दुकानांमध्ये फार्मासिस्टच्या उपस्थितीत औषध विक्री होते का, हे तपासण्यासाठी एफडीएने (FDA) मागील महिन्यापासून राज्यभरात मोहिम राबवली आहे. त्याअंतर्गत पुणे विभागात (Pune division) पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील 722 औषध दुकानांची तपासणी करण्यात आली.

तपासणी दरम्यान 688 दुकानांमध्ये फार्मासिस्ट उपस्थित होते. परंतु 34 दुकानांमध्ये फार्मासिस्ट उपस्थित नसताना औषध विक्री सुरु असल्याचे आढळून आले. यापैकी 34 दुकानांना ‘स्टॉप सेल’ची नोटीस बजावण्यात आली आहे, अशी माहिती एफडीए पुणे विभागाचे सहआयुक्त (औषध) एस. बी. पाटील (Joint Commissioner (Medicine) S. B. Patil) यांनी दिली.

पुणे विभागात करण्यात आलेल्या तपासणीमध्ये सर्वाधिक औषध दुकानांची तपासणी पुणे जिल्ह्यात करण्यात आली. पुण्यात तपासण्यात आलेल्या 311 दुकानांपैकी 14 ठिकाणी फार्मासिस्ट उपस्थित नव्हते. त्यामुळे या दुकानांना ‘स्टॉप सेल’ची नोटीस बजावण्यात आली आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली.

औषध दुकानांमधून औषधांची विक्री होत असताना त्या ठिकाणी फार्मासिस्ट असणे आवश्यक आहे. औषध दुकानात फार्मासिस्ट आहे की नाही याची अचानक तपासणी करणार आहे. फार्मासिस्ट नसलेल्या दुकानांचे परवाने रद्द करण्यात येणार आहेत. त्यामुळे फार्मासिस्टच्या उपस्थितीतच औषधांची विक्री करावी, असे पाटील यांनी सांगितले.

 

एफडीए कारवाई

 

जिल्हा  –  औषध दुकाने  –  फार्मासिस्ट होता   –    फार्मासिस्ट नाही    –    टक्केवारी

पुणे     –       311              –      297                     –         14                        –        5
सोलापूर –    108             –      105                     –         3                          –        3
कोल्हापूर  – 106             –      97                       –         9                          –        8
सांगली     –  58               –      54                       –         4                          –        7
सातारा    –   139             –      135                     –         4                          –        3

 

Web Title :- FDA | food and drug administration cracks down on 34 drug stores in pune division

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Bitcoin | 13 वर्षांचे झाले बिटकॉईन, सहा पैशांपासून सुरू केलेला प्रवास पोहचला 48.2 लाखांपर्यंत

Indrani Balan Foundation | पहिली ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा ! पुनित बालन ग्रुप संघाचा सलग दुसरा विजय; व्हिज्डम् क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाची विजयी सलामी !

MLA Gopichand Padalkar | ‘आर्यन खान या नशेबाज पोराला वाचविण्यासाठी ठाकरे सरकारचा आटापिटा’ – गोपीचंद पडळकर

Pune Metro | पिंपरी-चिंचवडकरांसाठी खुशखबर ! डिसेंबर अखेर पीसीएमसी ते फुगेवाडी मेट्रो धावणार