Female Teachers | शिक्षण विभागाच्या मुख्यालयाबाहेर 5 महिला शिक्षकांनी प्यायले विष, जाणून घ्या पूर्ण प्रकरण; पहा Video

कोलकाता : वृत्तसंस्था – Female Teachers | पश्चिम बंगाल शिक्षण विभागाच्या कोलकाता शहरातील साल्ट लेक येथील विकाश भवन मुख्यालयाच्या बाहेर मंगळवारी 5 महिला शिक्षकांनी विष प्यायले (Five female teachers drank poison outside the Vikash Bhavan in Kolkata). महिला शिक्षक विष पितानाचा अस्वस्थ करणारा व्हिडिओ पत्रकार अनिंद्य बॅनर्जी यांनी शेयर केला आहे.

पश्चिम बंगालच्या शिक्षण विभागाच्या मुख्यालयाबाहेर नोकरीसंबधी मागण्यांसाठी आंदोलन करत असलेल्या प्राथमिक विद्यालयाच्या पाच कंत्राटी शिक्षकांनी कथित प्रकारे विष खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला (5 teachers allegedly tried to commit suicide by consuming poison).

एका पोलीस अधिकार्‍याने सांगितले की, घोषणाबाजी करत विकास भवनाच्या प्रांगणात जबरदस्तीने प्रवेश करणे आणि आपत्ती व्यवस्थापण कायद्याचे उल्लंघन केल्याने त्यांना अटक केली असता त्यांच्यापैकी चार जणींनी बाटलीतून कोणता तरी द्रव प्राशन केला.

 

 

त्यांनी सांगितले की, पाचव्या महिलनेने सुद्धा असेच करण्याचा प्रयत्न केला परंतु एका महिला कॉन्स्टेबलने तिला रोखले आणि ती जास्त विष पिऊ शकली नाही.

अधिकार्‍याने म्हटले, सर्व पाचही महिला शिक्षकांना सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृत गंभीर आहे
(Five female teachers have been admitted to government hospitals and are in critical condition).
पाचव्या महिलेच्या प्रकृतीचा धोका टळला आहे.

कंत्राटी शाळकारी शिक्षकांचे व्यासपीठ असलेल्या शिक्षक ओक्यो मंचा (Okyo Forum) शी संबंधित सर्व
आंदोलनकर्त्या शिक्षिका नोकरी पक्की करणे आणि त्यांच्या बदल्या रद्द करण्याची मागणी करत होत्या,
कारण या बदलीमुळे त्यांच्यापैकी अनेकजणींना घरापासून दूर जावे लागणार आहे.
या पाच शिक्षिकांनी शिक्षण मंत्री ब्रत्य बसु यांच्या निवासस्थानाबाहेर सुद्धा आंदोलन केले होते.

Web Title : Female Teacher | west bengal five female contractual teacher shocking video shows fainting after consuming poison

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | सिमकार्ड अपडेट करणे पडले महागात, ऑनलाइन दीड लाखांचा गंडा

Modi Government | 12 कोटी लोकांवर मोदी सरकार होणार मेहरबान, वार्षिक मिळतील 12000 रुपये; जाणून घ्या

Pune Crime | गांजाची विक्री करणारा नितीन डुकळे अटकेत