Fenugreek Seeds Health Benefits | मेथीच्या दाण्यांचे आश्चर्यकारक फायदे, हृदय आणि मधुमेहासाठी वरदान; जाणून घ्या

0
392
Fenugreek Seeds Health Benefits | benefits of fenugreek seeds for health
file photo

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Fenugreek Seeds Health Benefits | स्वयंपाकघरात आढळणार्‍या प्रत्येक मसाल्याचे वेगवेगळे फायदे आहेत. चवीबरोबरच आरोग्य आणि सौंदर्याशी (Health And Beauty) संबंधित अनेक गोष्टीही यातून मिळतात, ज्याबद्दल आपल्याला माहिती नसते (Fenugreek Seeds Health Benefits). यातीलच एक प्रकार म्हणजे मेथीचे दाणे (Fenugreek Seeds).

 

मेथीची भाजी आणि चटणी तुम्ही खाल्ली असेलच. तसेच त्यापासून बनवलेले लाडू हे गर्भवती महिलांसाठी तर खुपच गुणकारी आहे. मेथीचे तेलही (Fenugreek Oil) खुप गुणकारी असते. एकूणच मेथीचे दाणे हे मधुमेहींसाठी जणू वरदानच ठरतात. त्यांच्याबद्दल जाणून घेऊया (Fenugreek Seeds Health Benefits).

 

मेथी आरोग्यासाठी वरदान (Fenugreek Is A Boon For Health) –
मेथीचे दाणे पाण्यात भिजवून ठेवावे आणि मग त्याचे पाणी सेवन करावे, यात भिजलेले दाणेही चावले तर फारच फायदा होतो.

 

कोमट पाण्यासोबत १ चमचा मेथीच्या बियांची पूड सेवन केल्यास बद्धकोष्ठता, गॅस, पोट फुगणे, भूक न लागणे, अन्न न पचणे (Constipation, Gas, Stomach Bloating, Loss Of Appetite, Indigestion) अशा समस्यांमध्ये आराम मिळतो.

 

स्त्रियांसाठी उपयुक्त (Useful For Women) –
शरीरात रक्ताची कमतरता असल्यामुळे पाळी उघडपणे येत नाही. मेथीच्या दाण्यांमध्ये इस्ट्रोजेनचे गुणधर्म (Estrogen Properties) असतात. जे मासिक पाळीशी संबंधित समस्येसाठी (Menstrual Problems) फायदेशीर ठरतात.आहे. मासिक पाळीशी संबंधित समस्यांसाठी, १-२ ग्रॅम मेथीच्या दाण्यांचे सेवन करायला हवे. मेथीच्या सेवनाने वेदना कमी होतात. हवं असल्यास चहामध्ये मेथीचे दाणेही टाकून पिऊ शकतात.

 

कान दुखणे थांबते (Beneficial For Ear pain) –
कान फुगून दुखत असेल तर मेथी अगदी गुणकारी ठरते. मेथीचे दाणे दुधात बारीक करून गाळून कोमट पाण्यात तयार करावेत. ह्याच्या रसाचे १ ते २ थेंब कानात टाका. कान दुखणे दूर होईल.

रक्तातील साखर नियंत्रित करते (Controls Blood Sugar) –
मधुमेहींसाठी तर मेथीचे दाणे एक वरदानच आहे. एक चमचा मेथी दाण्यांची पावडर तयार करा. दररोज रिकाम्या पोटी कोमट पाण्यात टाकून प्यावे. मेथीचे दाणे पाण्यात भिजवून सकाळी चावून घ्या. तसेच ज्या पाण्यात मेथीचे दाणे भिजले होते. तुम्ही त्याचे सेवनही करू शकतात.

 

त्वचारोगांसाठीही फायदा (Beneficial For Skin Disease) –
खाज सुटल्यास मेथीचे दाणे बारीक करून त्याची पेस्ट तयार करून खाज सुटणार्‍या भागावर लावा. त्यामुळे जखमेला आराम मिळेल. याशिवाय सूज येत असल्यास मेथीची पाने दळून ती सूजलेल्या भागावर लावावेत. जळजळीतही खूप आराम मिळेल.

 

प्रसूतीनंतर मेथीचा वापर गुणकारी (Use Of Fenugreek After Delivery Is Beneficial) –
प्रसूतीनंतर मेथीचे सेवन स्त्रियांसाठी खूप फायदेशीर आहे. मेथीच्या सेवनाने आईच्या दुधाची गुणवत्ता वाढते.
त्याचबरोबर बाळाचे आरोग्यही खूप चांगले राहते. मेथी सूप, हिरव्या भाज्या (Green Vegetables) किंवा भाज्या देखील खाव्यात.

 

हृदयरोगासाठी फायदेशीर (Beneficial For Heart Disease) –
मेथीमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म (Antioxidant Properties) असतात, जे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांसाठी खूप फायदेशीर असतात.
मेथीच्या १०-१५ मिलीलीटर काढ्यात मध टाकून प्यायल्याने हृदयरोगापासून मुक्ती मिळते.
कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी दररोज मेथीच्या दाण्यांचा आहारात समावेश करा.

 

केस गळणे रोखा (Prevent Hair Loss) –
मेथी केसांना लावल्याने केस गळणेही कमी होते. रात्री मेथीचे दाणे १-२ चमचे भिजवून ठेवावे. सकाळी उठून केसांना लावा.
केसांमध्ये १० मिनिटे ठेवा आणि नंतर साध्या पाण्याने केस धुवा. आठवड्यातून दोन ते तीन वेळा केसांना लावा. केस गळण्याची समस्या कमी होईल.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Fenugreek Seeds Health Benefits | benefits of fenugreek seeds for health

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Juices For Kidney Stones | किडनी स्टोनच्या समस्येत उपयोगी आहेत ‘हे’ 3 ज्यूस, आजपासूनच डाएटमध्ये करा समावेश

 

Chronic Kidney Disease | शरीरातील ‘हे’ संकेत असू शकतात क्रोनिक किडनी डिसीजचे लक्षण; जाणून घ्या

 

Blood Sugar कंट्रोल करण्यात प्रभावी आहे सत्तू, ‘या’ पध्दतीनं करावं सेवन, जाणून घ्या