इयत्‍ता 5 वी, 8 वी च्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्‍तीत वाढ, शिक्षणमंत्र्यांचा निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी इयत्‍ता 5 वी आणि 8 वी च्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्‍ती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतची घोषणा देखील करण्यात आली आहे. शालेय शिक्षणमंत्री आणि बालभारती नियामक मंडळाची शुक्रवारी मुंबईत बैठक पार पडली. त्यामध्ये काही महत्वाचे निर्णय जाहीर करण्यात आले आहेत.

यापुर्वी 5 वी आणि 8 वीच्या शिष्यवृत्‍तीधारक विद्यार्थ्यांना 9 प्रकारांमध्ये 20 रूपये एवढी कमी शिष्यवृत्‍ती मिळत होती. वर्षाला केवळ 240 रूपये आणि दोन वेगवेगळया प्रकारांमध्ये 100 रूपये प्रति महिना असे शिष्यवृत्‍तीचे स्वरूप होते. आता त्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व 11 प्रकारच्या शिष्यवृत्त्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. शिष्यवृत्‍तीच्या रक्‍कमेशिवाय प्रति विद्यार्थी वार्षिक रक्‍कम 750 रूपये बालभारतीमार्फत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तब्बल 32 हजार शिष्यवृत्‍तीधारक विद्यार्थ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. दरम्यान, अतिवृष्टी आणि पूरामुळं बाघलेल्या 2177 शाळांसाठी तसेच इतर मोडकळीस आलेल्या आणि पडलेल्या शाळांच्या उभारणीसाठी 57 कोटी रूपयांचा निधी मंडळामार्फत उपलब्ध करून देण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

राज्यातील प्रत्येक तालुक्यातील 2 शाळांमध्ये व्हर्च्यअल क्लासरूम
विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षण घेता यावे म्हणून राज्यातील प्रत्येक तालुक्यातील किमान 2 शाळांमध्ये व्हर्च्युअल क्लासरूमच्या माध्यमातून आदर्श शिक्षकांचे मार्गदर्शन तसेच नामवंत तंत्रज्ञ, लेखक, कवी साहित्यिक, कलाकार आणि इतर तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेता यावे यासाठी राज्यातील तब्बल 725 शाळांमध्ये व्हर्च्युअल क्लासरूम प्रकल्प राबविण्यासाठी 50 कोटी रूपयांच्या खर्चास मंजुरी देण्यात आली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

Loading...
You might also like