कायनेटीक चौकात राडा, ४ जण जखमी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील कायनेटीक चौकातील दिपाशा फार्ममध्ये घुसून 15 ते 20 जणांच्या टोळक्याने राडा घातला. आतील चार कामगारांना लाकडी दांडके, लोखंडी गजाने बेदम मारहाण केली. तसेच तोडफोडही केली.

मारहाणीत राज भाऊसाहेब लोखंडे, भाऊसाहेब लोखंडे, स्वप्नील दरोडे, रोहित खरात (सर्व रा. कायनेटिक चौक, नगर) हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी सौरभ जाधव, सचिन वाघ, निलेश जाधव, प्रदीप जाधव, बाबासाहेब अंबादास जाधव व इतर 10 ते 15 अनोळखी इसमांविरुद्ध (सर्व रा. जाधव मळा, कायनेटिक चौक) कोतवाली पोलिस ठाण्यात बेकायदा जमाव जमवून मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काल सकाळी 8 वाजता राज लोखंडे व इतर कायनेटीक चौकातील सुभद्रानगर येथील दिपाशा फार्म येथे सफाई करीत होते. त्यावेळी फार्मचा दरवाजा तोडून 15 ते 20 जणांचे सशस्त्र टोळके आत घुसले. त्यांनी शिवीगाळ, दमदाटी करून लोखंडी गज व लाकडी दांडक्याने डोके व हात पायावर बेदम मारहाण केली. मारहाणीत चार जण जखमी झाले आहे. तसेच फार्मच्या लाईटचा मीटर तोडून नुकसान केले. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात राज लोखंडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘ही’ पेये प्यायल्यास वजन होईल कमी, शरीराला मिळेल ऊर्जा

 ‘वजन’ कमी करताना घाई करू नका, हळूहळू करा कमी

 ‘हे’ नैसर्गिक उपाय केल्यास घेता येईल गाढ झोप

 रक्तचाचणी द्वारे कळू शकते आयुर्मान आणि भविष्यातील आजार