पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची जी शपथ घेतली होती ती लोकशाहीला काळीमा फासणारी व घटनाबाह्य आहे. त्यामुळे त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करुन ठोस कारवाई करावी अशी मागणी अॅड. पुष्कराज परदेशी यांनी खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांच्याकडे लेखी तक्रारीद्वारे केली आहे.
भाजपची साथ शिवसेनेने सोडल्याने स्वबळावर व काही अपक्ष आमदारांच्या सहकार्याने भाजपला सरकार स्थापन करणे अशक्य होते. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी संगनमताने गैरप्रकार केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या सह्या असलेली कागदपत्रे विधिमंडळ पक्ष नेते या नात्याने ताब्यात घेऊन राज्यपालांना सर्व आमदारांचा पाठिंबा असल्याचे भासवून फसवणूक केली. शपथविधी झाल्यानंतर शरद पवार यांनी हि अजित पवार यांची वैयक्तीक कृती असून पक्षाचा कोणताही संबंध नाही असे जाहीर केले.
देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी संख्याबळ होत नसल्याने राजीनामा दिला. तरी फडणवीस व पवार यांच्या या कृत्याने घटनेची मुलभूत तत्वे पायदळी तुडवली असल्याने याची सर्वांगीण चौकशी होऊन ठोस कारवाई केली जावी अशी मागणी अॅड. परदेशी यांनी केली आहे.
Visit : Policenama.com
- सावधान ! गरम-गरम चहा पिण्याची सवय पडू शकते महागात, ‘हे’ आहेत ३ धोके
- दाट केसांसाठी बहुगुणी आहे आवळा, होतील ‘हे’ ६ फायदे
- सावधान ! ‘या’ ५ गोष्टी वॉशरूममध्ये घेऊन जाऊ नका, जाणून घ्या
- बाळंतपणानंतरचे वजन कमी करायचे आहे का ? ‘हे’ ७ उपाय करा
- अपचन, कंबरदुखी, आणि नैराश्यावर ‘हा’ एकच उपाय, हे आहेत ५ फायदे
- उपवास केल्याने होतात हे १४ आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या
- ‘हे’ असू शकते जुनाट आजाराचे मूळ, वेळीच लक्ष देऊन करा हे उपाय