मंत्रालयात खळबळ ! कुणी बदलला CM उद्धव ठाकरेंचा आदेश, मुख्यमंत्र्यांच्या ‘सही’च्यावर लाल शाईनं ‘टिप्पणी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात सीएम ऑफिसमध्ये बनवेगिरीचे एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. ही फसवणूक एका वेगळ्या प्रकारची आहे. या बनवेगिरीद्वारे मुख्यमंत्र्यांचा आदेशच बदलण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पीडब्ल्यूडी विभागाच्या एका इंजिनियर विरूद्ध भ्रष्टाचाराच्या प्रकरणात विभागीय चौकशीचे आदेश दिले होते.

इंजिनियरविरूद्ध चौकशी आदेशासोबत फाइल सीएम कार्यालयातून बाहेर तर पडली, परंतु ही फाइल जेव्हा पीडब्ल्यूडी विभागात पोहचली तेव्हा येथे सीएमचा आदेशच बदलला होता. पीडब्ल्यूडी विभागात जेव्हा ही फाइल उघडली गेली, तेव्हा अधिकारी हैराण झाले. फाइलमध्ये सीएमच्या सहीच्यावर लाल शाईने लिहिले होते की, या इंजिनियरविरूद्धची चौकशी बंद करण्यात आली पाहिजे, तर अन्य इंजिनियरविरूद्ध चौकशी सुरू राहील.

अगोदर जाणून घेवूयात प्रकरणाची पार्श्वभूमी
अगोदरच्या भाजपा सरकारने अनेक पीडब्ल्यूडी इंजिनियर्स विरूद्ध चौकशीचे आदेश दिले होते. हे प्रकरण जेजे स्कूल ऑफ ऑर्टसशी संबंधीत आहे. येथील बांधकामात काही गडबड समोर आली होती. भाजपाच्या या आदेशाला सध्याच्या सरकाने गांभिर्याने घेतले. या प्रकरणावर कारवाईसाठी पीडब्ल्यूडी विभागाने ही फाइल सीएमकडे पाठवली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणात विभागीय चौकशीचे आदेश दिले होते. परंतु आता आढळले की, या प्रकरणात विशेष इंजिनियरच्या विरूद्ध चौकशीच्या फाइलमध्ये छेडछाड करण्यात आली आहे. हा इंजिनियर तेव्हा एग्झीक्युटीव्ह होता जो आता प्रमोट होऊन सुपरिंटेंडंट इंजिनियर बनला आहे.

थेड सीएमच्या फाइलमध्ये छेडछाड
महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (पीडब्ल्यूडी) अशोक चव्हाण आहेत, ते स्वत: सुद्धा राज्याचे सीएम होते, यामुळे त्यांना कागदपत्रांची गुंतागुंत माहित आहे.

अशोक चव्हाण यांनी जेव्हा ही फाइल पाहिली तेव्हा त्यांना शंका आली. सीएम उद्धव ठाकरे यांच्या सहीच्यावर चौकशी बंद करण्यासंबंधी नोटिंग काहीसे अजब प्रकारे लिहिले होते, याशिवाय लाल शाईचा वापर करण्यात आला होता आणि एकमेकांना चिकटलेली अक्षरे पाहून सुद्धा त्यांना जाणवले की सर्वकाही सामान्य नाही. आणखी एक गोष्ट ज्यामुळे अशोक चव्हाण यांना आश्चर्य वाटले, ती म्हणजे सर्व इंजिनियर्सविरूद्ध चौकशी सुरू ठेवण्यास सांगण्यात आले होते, केवळ एकाला सूट देण्यात आली होती. संपूर्ण प्रकरण त्यांना सामान्य वाटले नाही.

पीडब्ल्यूडी विभागने सीएम ऑफिसला पुन्हा पाठवली फाइल
पीडब्ल्यूडी मंत्री अशोक चव्हाण यांनी ही विशेष फाइल पुन्हा सीएम ऑफिसला क्रॉसचेक करण्यासाठी पाठवली. सीएम ऑफिसमध्ये त्या सर्व कागदपत्रांची एक कॉपी ठेवली जाते ज्यांच्यावर सीएम सही करतात. जेव्हा त्या कॉपीशी ही फाइल पडताळून पाहिली गेली तेव्हा अधिकारी हैराण झाले, ही बनवेगिरी टॉप लेव्हलचे प्रकरण होते, जिथे सीएमचा आदेशच बदलण्यात आला होता. अधिकार्‍यांना आढळले की, ज्या आदेशावर सीएमने सही केली होती त्यामध्ये चौकशी थांबवण्याचा उल्लेख नव्हता. अशाप्रकारे प्रकरणाचा पर्दाफाश झाला.

मंत्रालयामध्ये प्रचंड खळबळ
या बनवेगिरीची माहिती समजल्यानंतर मंत्रालयात प्रचंड खळबळ उडाली आहे. सीएमचा आदेश बदलण्याचे हे प्रकरण अतिगंभीर आहे. यामुळे ताबडतोब मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींच्या विरूद्ध एफआयआर दाखल करण्यात आला. पोलीस आता तपास करत आहेत की, सीएमच्या आदेशात फेरबदल कुणी केला. या व्यक्तीची माहिती अद्याप पोलिसांना मिळालेली नाही.

दरम्यान, भाजपाने या घटनेवर प्रतिक्रिया दिली असून म्हटले आहे की, या सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांचे कार्यालयसुद्धा सुरक्षित नाही आणि यामध्ये छेडछाड केली जाऊ शकते.