सणासुदीच्या आधीच बोनस ! निर्मला सीतारामन यांची कॉर्पोरेट जगताला दिलासा देणारी घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निर्मला सीतारामन यांनी कॉर्पोरेट सेक्टरला दिलासा देणारी घोषणा केली आहे. कंपनी करात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सणासुदीच्या आधीच अर्थमंत्र्यांकडून मिळालेल्या या मोठ्या वृत्तामुळे या निर्णयाचं शेअर बाजाराकडूनही स्वागत करण्यात आलं. या नंतर शेअर बाजाराचा निर्देशांक 900 अंकांनी उसळल्याचं पहायला मिळालं.

गोव्यात आयोजित पत्रकार परिषदेत निर्मला सीतारामन यांनी ही घोषणा केली. कॉर्पोरेट सेक्टरला दिलासा देणारी ही घोषणा होती. कंपनी करात कपात करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

उद्योग क्षेत्राला उभारणी देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. कपातीनंतर कंपन्यांना आता 25.17 % कर द्यावा लागणार आहे.

देशभरातील तब्बल 99.3 % कंपन्या किमान अशा 25 % कंपनी कर टप्प्यात येणार असून अवघ्या 0.7 % कंपन्या या सर्वोच्च अशा 30 % करांमध्ये कायम राहणार असल्याचे म्हटले होते. निर्मला सीतारामन यांनी दिवाळी आधीच दिलेल्या या वृत्तामुळे कॉर्पोरेट जगतात आनंद व्यक्त केला जात आहे.

You might also like