शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक अनिल भोसले यांच्यासह 11 जणांविरूध्द FIR, गुन्हा दाखल
बँकेच्या रेकॉर्ड मध्ये बनावट नोंदी केल्याचे निष्पन्न
![anil-bhosle](https://i0.wp.com/policenama.com/wp-content/uploads/2020/01/anil-bhosle.jpg?resize=750%2C450&ssl=1)
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या रेकॉर्डमध्ये बनावट नोंदी करून त्या खऱ्या असल्याचे भासवून तब्बल ७१ कोटी ७८ लाखांचे व्यवहार लपवून ठेवल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी आमदार अनिल शिवाजीराव भोसले यांच्यासह ११ जणांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २५ मे दरम्यान घडली आहे. याप्रकरणी योगेश लकडे (वय २९, रा. आंबेगाव बुद्रुक) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अनिल भोसले, शैलेश भोसले, तानाजी पडवळ, विष्णू जगताप, हनुमान सोरते यांच्यासह ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीराव भोसले सहकारी बँकेत अनिल भोसले व्यवस्थापकीय संचालक आहेत. २०१८-१९ च्या बँक लेखा जोखा अहवालात भोसले यांच्यासह ११ जणांनी फायद्यासाठी बँकेच्या रेकॉर्डमध्ये बनावट नोंदी करून खऱ्या असल्याचे भासवून ७१ कोटी ७८ लाख लपवून ठेवले. मात्र, बँकेच्या ऑडीटमध्ये संबंधित नोंदी बनावट असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस अधिक तपास करीत आहेत.
फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/
- ‘या’ 5 टिप्स फॉलो केल्यास दिवसाची सुरुवात होईल चांगली
- दाढी करण्यासाठी ‘रेझर’ वापरताय? ‘या’ 4 गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका !
- मुलांना कोणतं खेळणं देताय ? होऊ शकतात ‘हे’ 6 गंभीर धोके !
- ‘अॅस्प्रिन’ने टळू शकत नाही ‘हार्ट अटॅक’चा धोका ! हे आहेत 4 धोके
- ‘टीबी’ ची ही 6 कारणे जाणून घेतली तर टाळता येणे सहज शक्य, जाणून घ्या
- काळे मीठ खा; हृदयरोगांना दूर ठेवा, ‘हे’ आहेत 9 फायदे
- मुलांना होणारा क्षय ‘या’ 5 लक्षणांवरून ओळखा, जाणून घ्या
- मुलांना ‘पॅरासिटामोल’ देताय ? तारुण्यात होईल अस्थमा ! ‘हे’ आहेत 6 धोके
- दम्याची ही आहेत 8 लक्षणे, अधिक माहिती जाणून घेण्यासाठी जरूर वाचा