लहान मुलांचा अश्लील व्हिडिओ पाठवणाऱ्यावर FIR

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – लहान मुलांचा अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर पाठवणाऱ्यावर सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. केवा परबाराम देवासी (21, रा. पिंपळे गुरव, सांगवी. मूळ रा. गोयली गाव, ता. जि. सिरोई, राजस्थान) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गणेश माने यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवासी याने 5 जानेवारी रोजी पिंपळे गुरव येथून त्याच्या मोबाईलवरुन लहान मुलांचे अश्लील व्हीडीओ फेसबुकवरुन त्याच्या एका मित्राला पाठवले. ही बाब शोषित आणि गहाळ मुलांसाठी काम करणा-या (एनसीएमईसी) या संस्थेच्या निदर्शनास आली. त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. महाराष्ट्र राज्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक तथा नोडल अधिकारी यांनी सांगवी पोलिसांना अहवाल पाठवून गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार, सांगवी पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायदा 67 बी आणि पॉस्को अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सांगवी पोलीस करीत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/