महिला सरपंचाचा छळ केल्याप्रकरणी पतीसहित सासरच्या मंडळींवर FIR दाखल

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   वंशाला दिवा हवा म्हणून महिला सरपंचचा शारीरिक व मानसिक छळ करणार्‍या त्यांच्या पतीसहित सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना भोर तालुक्यातील एका गावात उघडकीस आली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार राजगड पोलीस ठाण्यात पीडित महिला सरपंचानी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार त्यांचे पती, सासु, सासरे, नणंद यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या महिला सरपंचना एक सतरा वर्षांची मुलगी आहे. त्यांना तेरा वर्षांचा एक मुलगा देखील होता परंतू काही दिवसांपूर्वी अपघातात त्याचे निधन झाले. त्यानंतर महिला सरपंचांच्या सासरकडच्या लोकांनी पुन्हा मुलगा व्हावा यासाठी त्यांच्यावर दबाव टाकण्यास सुरूवात केली. त्यांचा शारीरिक व मानसिक छळ केला. त्यांना मारहाणही केली. त्यांच्या या त्रासाला कंटाळून महिला सरपंचानी राजगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.