AIMIM चे नेते वारिस पठाणांना महागात पडलं वादग्रस्त वक्तव्य, ‘चिथावणी-व्देष’ पसरविण्याच्या आरोपावरून FIR

कलबुर्गी : वृत्त संस्था – ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद-उल मुस्लिमीन(एमआयएमआयएम) चे नेते वारिस पठाण यांच्या विरूद्ध कर्नाटकच्या कलबुर्गी पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. वारिस पठाण यांनी एका वादग्रस्त आणि प्रक्षोभक वक्तव्यात म्हटले होते की, आम्ही 15 करोडच 100 करोड लोकांवर भारी पडू. नागरिकत्व संशोधन कायद्याविरोधात कर्नाटकच्या गुलबर्गामध्ये आयोजित सभेत वारिस पठाण यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले होते.

वारिस पठाण यांच्या विरूद्ध भारतीय दंड विधान कलम 117, 153 (दंगल पसरवणे आणि चिथावणी) आणि कलम 153 ए(दोन समुदायात द्वेष पसरवणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

19 फेब्रुवारीला नागरिकत्व कायद्याच्या (सीएए) विरोधात एका रॅलीत वारिस पठाण यांनी म्हटले होते की, आपण एकजुट होण्याची वेळ आली आहे आणि स्वातंत्र्य मिळवले पाहिजे. लक्षात ठेवा, आपण 15 करोडच 100 करोड लोकांवर भारी पडू शकतो. पठाण यांच्या या वक्तव्यावर सर्वांनी जोरदार टीका केली होती.

वारिस पठाण यांच्यावर पक्षाकडून बोलण्यास बंदी

वारिस पठाण यांच्या प्रक्षोभक भाषणांवर पक्ष प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी कारवाई केली आहे. वादग्रस्त वक्तव्यानंतर पक्षावर झालेल्या चौफेर टीकेनंतर असदुद्दीन ओवैसी यांनी वारिस पठाण यांच्यावर मीडियाशी बोलण्यास बंदी आणली आहे. आता पक्ष जोपर्यंत परवानगी देत नाही तोपर्यंत वारिस पठाण सार्वजनिक वक्तव्य करू शकणार नाहीत.

वारिस पठाण एमआयएमचे प्रवक्ता आहेत आणि पक्षाचे प्रसिद्ध नेते आहेत. रॅलीमध्ये वारिस पठाण म्हणाले होते की, आम्ही वीटेला दगडाने उत्तर देण्यास शिकलो आहोत. परंतु आपल्याला एकत्र येऊन चालावे लागेल. स्वातंत्र्य मिळवावे लागेल, आणि ज्या गोष्टी मागून मिळत नाहीत त्या हिसकावून घेतल्या जातात.

वारिस पठाण यांनी मागितली नाही माफी

जेव्हा वक्तव्यावरून वाद वाढला तेव्हा वारिस पठाण यांनी म्हटले की, मी देश आणि धर्माच्या विरूद्ध काहीही वक्व्य केलेले नाही. सीएएच्या विरोधात सर्व धर्माचे लोक आंदोलन करत आहेत. भाजपाचे नेते तर गोळी मारण्याची वक्तव्य करतात. भाजपा देशातील लोकांचे विभाजन करू पहात आहे. लोकांना समजावणे जरूरी आहे. मी माझ्या वक्तव्यावर माफी मागणार नाही.

भाजपाची मागणी – एमआयएमवर बंद आणा

योगी सरकारचे मंत्री मोहसिन रजा यांनी असदुद्दीन ओवैसी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मोहसिन रजा यांनी म्हटले होते की, ओवैसी आणि त्यांचे प्रवक्ते ज्यापद्धतीने द्वेष पसरवत आहेत, ज्यापद्धतीने त्यांच्या व्यासपीठाचा वापर भारतविरोधी घोषणा देण्यासाठी आणि हालचालींसाठी होत आहे, यावरून हे स्पष्ट झाले आहे की, त्यांचा हेतू काय आहे. ज्या पद्धतीने यांच्या ज्येष्ठांनी पाकिस्तान बनवला आणि देशाची फाळणी केली आणि देश तोडला आहे, ते पाहता माझी मागणी आहे की, यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करून त्यांच्या पक्षावर बंद आणावी.