शिवसेनेचे आमदार चाबुकस्वार यांच्यासह पाच जणांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – पिंपरी येथील मूलचंदानी खून प्रकरणात पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. मात्र राजकीय हेतूने राष्ट्रवादीचे नगरसेवक हीरानंद आसवानी यांच्या विरोधात सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट टाकल्याप्रकरणी पिंपरीचे शिवसेनेचे आमदार गौतम चाबुकस्वार आणि पाच जणांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजकीय हेतूने मला गुंतवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती नगरसेवक आसवानी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

२३ जुलैला पिंपरी येथे हितेश गोदूमल मूलचंदानी याचा खून झाला. याबाबत पोलिस योग्य तपास करीत आहेत. परंतू पिंपरीचे स्थानिक आमदार गौतम चाबुकस्वार व इतर हे माझ्या विषयी राजकीय हेतूने प्रेरीत होत विनाकारण माझी कौटुंबिक, सामाजिक, राजकीय प्रतिष्ठा खराब होईल या उद्देशाने सोशल मिडियाच्या माध्यमातून प्रचार, प्रसार करीत आहेत. खून झालेल्या व्यक्तीचे वडील गोदूमल मूलचंदानी यांच्यावर माझ्याविरोधात पोलिस ठाण्यात व माननीय न्यायालयात जबाब द्यावा यासाठी आमदार गौतम चाबुकस्वार हे मोबाईलवरून दबाव आणीत आहेत. त्यामुळे गोदूमल मूलचंदानी व आमचे कुटुंब प्रचंड ताणतणावात आहोत.

याप्रकरणात जाणूनबूजून खोटी व चुकीची माहिती व्हॉट्‌सॲप व फेसबुकवरून पसरवली जात आहेत. पिंपरीतील वातावरण अशांत करून तणाव निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. याबाबत माझ्याकडे संबंधितांचे झालेले फोन रेकॉर्डींग, व्हॉट्‌सॲप रेकॉर्डींगचे डिटेल्स आहेत. याविषयी मी पिंपरी पोलीस चौकी येथे आमदार गौतम चाबुकस्वार, जितु मंगतानी , सुरेश निकालजे, राजू नागपाल, किशोर केशवानी यांच्याविरुद्ध भादंवी कलम ५००, ३४, ५०६ नुसार अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अशी माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी उपमहापौर हिरानंद ऊर्फ डब्बू आसवानी गुरुवारी (८ ऑगस्ट २०१९) पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. या वेळी कै. हितेश मूलचंदानी याचे वडील गोदूमल मूलचंदानी, उद्योजक राजूशेठ आसवानी आदि उपस्थित होते.

आरोग्यविषयक वृत्त

 

You might also like