
Fire In Dhayari Pune | पुणे : धायरीत तीन कारखान्यांना आग, सुट्टी असल्याने गंभीर दुर्घटना टळली
पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Fire In Dhayari Pune | सिंहगड रस्त्यावरील (Sinhagad Road) धायरीतील औद्योगीक वसाहतीमध्ये तीन कारखान्यांना शनिवारी दुपारी आग लागली. यामध्ये कारखान्यातील साहित्य, कच्चा माल जळून खाक झाला. कारखान्याला सुट्टी असल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. (Fire In Dhayari Pune)
धायरीच्या या औद्योगिक वसाहतीमध्ये अनेक लघुउद्योग असून येथे गाड्यांची बॅटरी, सुटे भाग तयार करण्याचे कारखाने आहेत. शनिवारी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास बंद कारखान्यातून धूर येऊ लागला. रहिवाशांनी तातडीने अग्निशमन दलाशी संपर्क साधून माहिती दिली. (Fire In Dhayari Pune)
यानंतर घटनास्थळी पुणे अग्निशमन दलाचे ८ बंब आणि टँकर आले. दरम्यान, आग आणखी भडकल्याने पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचा बंब सुद्धा घटनास्थळी आला. यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले.
अग्निशमन दलाचे अधिकारी रमेश गांगड, प्रकाश गोरे, गजानन पाथ्रुडकर, प्रभाकर उम्राटकर यांच्या
मार्गदर्शनाखाली जवानांनी पाण्याचा मारा करुन तासाभरात आग नियंत्रणात आणली.
आज कारखान्याला सुट्टी असल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
या आगीत कारखान्यातील कच्चा माल, साहित्य जळून खाक झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
हे देखील वाचा
Sudhir Mungantiwar | भाजपा राज्यातले मंत्री आणि आमदारांना लोकसभेच्या रिंगणात उतरवणार?
Dog Bites Cases In Pune | पुण्यात आठ महिन्यांत तब्बल १४ हजार श्वानदंश, सुदैवाने एकालाही रेबीज नाही