Fire Kamala Building Tardeo Mumbai | मुंबईतील ताडदेव परिसरात बहुमजली इमारतीला आग; 7 जणांचा मृत्यू तर 15 जखमी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Fire Kamala Building Tardeo Mumbai | ताडदेव परिसरात २० मजली असलेल्या कमला इमारतीला (Kamala Building In Tardeo) आग लागल्याची घटना आज सकाळची साडेसात वाजता घडली. अग्नीशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली असून यामध्ये सात जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, आगीत १५ जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेने (BMC) दिली आहे.

 

ताडदेव भाटिया रुग्णालयाच्या जवळ २० मजली कमला इमारत आहे. आज सकाळी इमारतीच्या १८ व्या मजल्यावर आग लागली होती. घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या १३ गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या होत्या. ही आग ३ची असल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली असून यात सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर १५ जखमींना नजीकच्या भाटिया रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

दरम्यान घटनास्थळी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (bmc mayor kishori pednekar) आणि स्थानिक आमदारांनी देखील भेट दिली.
यावेळी महापौर पेडणेकर म्हणाल्या की, आग नियंत्रणात आली असली तरी धूर प्रचंड होता, सर्व लोकांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.
सहा वृद्ध व्यक्तींना ऑक्सिजनची गरज असून त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

Web Title :- Fire Kamala Building Tardeo Mumbai | seven people have died in the fire incident that broke out in 20 storeys kamala building tardeo mumbai

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा