‘त्या’ मुलीचा बॉयफ्रेंड असल्याने तरुणावर गोळीबार, तरुण जखमी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – एका मुलीचा बॉयफ्रेंड असल्यामुळे दोघांनी एका तरुणावर गोळीबार करुन जखमी करण्याचा प्रकार घडला आहे. दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी तरुणाच्या पायावर गोळीबार करुन जखमी करुन त्यांच्या खिशातील रोकड व मोटरसायकल जबरदस्तीने चोरुन नेली. ही घटना आळंदी ते चाकण घाट रस्त्याने एम आय टी कॉलेजजवळून जाणाऱ्या रस्त्यावर २३ जुलैला रात्री ९ वाजता घडली.

याप्रकरणी प्रविण हनुमंत शिंदे (वय २७, रा. राजगुरुनगर) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रविण शिंदे हे वॉटर प्युरीफायर्सची विक्री करण्याचे काम करतात. ते मोटरसायकलवरुन रात्री घरी जात असताना घाटात त्यांच्या मागून दोघे जण आले. त्यांनी प्रविण यांना अडविले. गाडीची चावी काढून घेतली. त्यातील एकाने हा चाकणकडे जाणारा रोड आहे का असे विचारले. त्याचवेळी तो हिंदीतून य इसका बायफ्रेंड है असे म्हणून पाठीमागे बसलेल्याने आपल्या खिशातून रिव्हाल्व्हर काढून त्याने गोळीबार केला. प्रविण यांच्या गुडघ्याला गोळी लागून ते जखमी झाले. त्यानंतर हल्लेखोरांनी त्यांच्या खिशातील ५०० रुपये, इतर सामान व मोटारसायकल जबरदस्तीने चोरुन नेली.

या घटनेनंतर प्रविण शिंदे याने आपल्यावर उपचार करुन घेतल्यानंतर पोलिसांशी संपर्क साधला. हल्लेखोरांनी इसका बॉयफ्रेड असे म्हटल्याने त्यांचा नेमका काय उद्देश होता, याबाबत पोलिसांना शंका आहे. मात्र, प्रविण शिंदे यांनी कोणतीही अधिक माहिती न दिल्याने पोलिसांचा तपास पुढे सरकला नाही. पोलीस निरीक्षक रवींद्र चौधर अधिक तपास करीत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like