उरळी कांचन येथे गोळीबार

उरळी कांचन : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे सोलापूर महामार्गावरील उरळी कांचन येथे एका व्यापाऱ्यावर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केल्याची घटना आज (मंगळार) रात्री आठच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवीतहानी झाली नसली तरी व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

उरळी कांचन येथील वर्दळीच्या रस्त्यावर असलेल्या वापारीमल सावलदास या कापड दुकानासमोर अज्ञाताने गोळीबार केला. गोळीबार कोणी आणि कोणत्या कारणामुळे केला हे अज्ञाप समजू शकले नाही. मात्र, या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांच्यासह अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरु आहे.

याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात संपर्क साधला असता पोलीस ठाण्यातील ठाणे आमलदार उघडे यांनी गोळीबार झाल्याचे सांगितले. मात्र, या घटनेत कोणतीही जीवीतहानी झाली नसल्याचेही उघडे यांनी सांगितले. तसेच घटनेची माहिती मिळाताच लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह इतर अधीकारी घटनास्थळी गेले असल्याचे त्यांनी सांगितले.

पुणे-सोलापूर महामार्ग हा नेहमी वर्दळीचा आहे. या मार्गावर अनेक व्यापाऱ्यांनी आपला व्यवसाय थाटला आहे. मात्र, आजच्या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. लोणी काळभोर पोलिसांचे पथक हल्लेखोराचा शोध घेत आहे. व्यापाऱ्यावर झालेल्या या हल्ल्याची माहिती काही क्षणात उरळी कांचनमध्ये पसरली. त्यामुळे व्यापाऱ्यांसह गावाकऱ्यांमध्ये देखील दहशतीचे वातावरण आहे.