पुण्यात गोळीबाराची तिसरी घटना : गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षकावर भरदिवसा गोळीबार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन-शहरात दिवसभरातील गोळीबाराची तिसरी घटना घडल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. आयुक्‍तालयाच्या गुन्हे शाखेतील युनिट-2 चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन पवार यांच्यावर दिवसाढवळया गोळीबार झाला आहे. पुणे रेल्वे स्टेशन परिसरात ही खळबळजनक घटना घडली आहे. जखमी झालेल्या वरिष्ठ पोलस निरीक्षक गजानन पवार यांना तात्काळ खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले असुन त्यांच्यावर उपचार चालु आहेत.

बुधवारी सकाळी चंदननगर परिसरातील आनंद पार्क येथील इंद्रायणी गृहरचना सोसायटीमध्ये एका महिलेवर गोळीबार झाला होता. त्यामध्ये एकता ब्रिजेश भाटी (38) यांचा मृत्यू झाला. सकाळी सर्व वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान, गुन्हे शाखेचे उपायुक्‍त शिरीष सरदेशपांडे, सहाय्यक आयुक्‍त समीर शेख, युनिट-2 चे पोलिस निरीक्षक गजानन पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज संग्रहित करून त्याव्दारे आरोपींचा शोध चालु केला. दरम्यान, संशयितांची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली.

संशयित पुणे रेल्वे स्टेशन परिसरात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक गजानन पवार यांना समजले. त्यानंतर निरीक्षक पवार आणि त्यांच्या पथकातील पोलिसांनी रेल्वे स्टेशन परिसरात सापळा रचला. संशयित आरोपी त्यांच्या टप्प्यात देखील आले. त्याचवेळी संशयितांनी त्यांच्या दिशेने गोळीबार केला. पुणे स्टेशन परिसरात भरदिवसा गोळीबार झाल्याने प्रचंड खळबळ उडाली. दरम्यान, पोलिस निरीक्षकावर गोळीबार झाल्याचे वृत्‍त शहरात सर्वत्र पसरले आणि प्रचंड खळबळ उडाली. पोलिस निरीक्षक पवार यांना रूबी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुन्हे शाखेचे अप्पर पोलिस आयुक्‍त प्रदीप देशपांडे यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षकावर गोळीबार झाल्याने संपुर्ण पुणे शहरात खळबळ उडाली असून पोलिस संशयित आरोपींचा शोध घेत आहेत. दरम्यान, पुणे स्टेशनवर प्रचंड गर्दी असल्याने तेथील नागरिकांमध्ये देखील खळबळ उडाली. गजानन पवार यांना गाेळ्या लागल्या आहेत.

ब्रेकिंग : पुण्यात भरदिवसा थरार : सराफी व्यावसायिकावर गोळीबार

खळबळजनक : पुण्यातील चंदननगरमध्ये महिलेवर गोळीबार