Coronavirus : ‘कोरोना’ व्हायरस महामारीच्या अँटीबॉडी उपचाराचं पहिलं मानवी परिक्षण झालं सुरू

न्यूयॉर्क : वृत्तसंस्था – फार्मास्यूटिकल कंपनी एली लिली अँड कंपनीने म्हटले की, संभाव्य ङध-उेत555 उपचार त्या रूग्णांच्या प्लाझ्मामध्ये मिळालेल्या अँटीबॉडीद्वारे तयार केला आहे, जो कोरोना व्हायरसचा आजार बरा करतो. वॉल स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्टनुसार, उपचारात प्लाझ्माचा वापर केलेला नाही. तर अँटीबॉडीजच्या क्लोनचा वापर केला आहे.

हा उपचार असा तयार केला आहे की, व्हायरसच्या काट्याच्या आकाराच्या प्रोटीन स्ट्रक्चरला निशाणा बनवेल आणि व्हायरसद्वारे मानवी पेशींना संक्रमित करण्यापासून रोखले जाईल. अशा प्रकारे ही थेरपी व्हायरसला प्रभावहीन करते. कंपनीचे म्हणणे आहे की, जर हे औषध सुरक्षित सिद्ध झाले तर कंपनी त्या रूग्णांवर उपचार सुरू करेल जे रूग्णालयात दाखल नाहीत.

कंपनीचे मुख्य संशोधन अधिकारी डॅनियल स्कोव्रोंस्की यांनी म्हटले की, आम्हाला वॅक्सीन किंवा अँटी व्हायरल अणूंच्या क्षेत्राचा जास्त अनुभव नाही. परंतु, अँटीबॉडी, त्यांचे इंजीनियरिंग करण्याचा, त्यांची चाचणी करण्याचा आणि त्यांना तयार करण्याचा अनुभव आहे. ही अशी क्षमता आहे, जी आमच्याकडे आहे, यासाठी आम्ही कोविडच्या उपचारात अँटीबॉडीवर प्रयोग करण्याचा निर्णय घेतला.

कंपनीने म्हटले, अभ्यासाच्या पहिल्या टप्प्यात या गोष्टीचा अभ्यास करण्यात येईल की औषध किती सुरक्षित आहे आणि हॉस्पिटलमध्ये भरती कोविड-19 च्या रूग्ण किती चांगल्या पद्धतीने हे सहन करू शकतात. कंपनीनुसार संशोधनातच्या पहिल्या टप्प्याचे परिणाम जूनच्या अखेर येऊ शकतात.

रिपोर्टनुसार न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी ग्रॉसमॅन स्कूल ऑफ मेडिसिन त्या केंद्रापैकी एक आहे जेथे याच्या पहिल्या टप्प्याची चाचणी होईल. युनिव्हर्सिटीच्या संसर्गजन्य रोग अणि वॅक्सीन संशोधन विभागाचे संचालक डॉ. मार्क जे मुलिगन यांनी म्हटले, आम्ही कोविड-19 ने पीडित रूग्णांना नवीन उपचारात भाग घेण्याची संधी देत आहोत. यातून ते लवकर ठिक होतील, अशी आशा आहे.