‘या’ राज्यातून झाले ९ पंतप्रधान, पण लोकसभा अध्यक्ष पद ‘मिळेना’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – १७ व्या लोकसभेत लोकसभा अध्यक्ष पदी राजस्थानचे ओम बिर्ला यांची निवड करण्यात आली. ओम बिर्ला यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. बिर्ला हे पहिले सभापती असतील जे राजस्थानातून आलेले असतील. याआधी १६ लोकसभा अध्यक्ष झाले परंतू एकही नेता राजस्थानातून निर्वाचित सदस्य नव्हता. असाच प्रकार आहे उत्तर प्रदेशचा, या राज्यातून आता पर्यंत ९ पंतप्रधान झाले परंतू एकही लोकसभा सभापती होऊ शकला नाही.

९ पंतप्रधान दिले, पण सभापती एकही नाही
लोकसभेचे पहिले सभापती जी.वी. मावळकर होते, जे महाराष्ट्रातून होते. तर १६ व्या लोकसभेत मध्य प्रदेशातून इंदोरच्या खासदार सुमित्रा महाजन यांना सभापती बनवण्यात आले होते. तर देशाला ९ पंतप्रधान देणाऱ्या उत्तर प्रदेशातून अजून एकही लोकसभेचा सभापती झालेला नाही. पंतप्रधान मोदी हे गुजरातचे असले तरी त्यांचे खासदारकीचे क्षेत्र वाराणसी आहे. जे उत्तर प्रदेशात आहे. जेथून ते आता पुन्हा एकदा निवडूण आले.

आतापर्यंत लोकसभेसाठी ज्या नेत्यांची निवड केली ते सर्वात जास्त आंध्रप्रदेशातील होते. तसेच इतर राज्यांमधून एन. संजीव रेड्डी आणि जी.एम. बालयोगी यांना लोकसभेत सभापती म्हणून निवडले होते. तर महाराष्ट्रातून जी.वी. मावळंकर, शिवराज पाटील आणि मनोहर जोशी हे देखील सभापती राहिले आहेत. पंजाब मधून हुकूम सिंह, जी.एस. ढिल्लो, बलराम जाखड हे देखील लोकसभेत सभापती होते. मात्र देशाला ९ पंतप्रधान देणाऱ्या उत्तर प्रदेशातून अजवर एकही नेता लोकसभा सभापती म्हणून निवडूण गेला नाही.

या राज्यातून आतापर्यंत लोकसभा अध्यक्ष
बिहारमधून मीरा कुमार १५ व्या लोकसभेत अध्यक्ष पदी होत्या. याच राज्यातून बली राम भगत ५ व्या लोकसभेत अध्यक्ष होते. कर्नाटक मधून के. एस. हेगडे, पश्चिम बंगाल मधून सोमनाथ चटर्जी, मेघालयातून पी,ए. संगमा, ओडिशांतून रवि राय या राज्यातील नेते लोकसभेत अध्यक्ष झाले आहेत.

आरोग्यविषयक बातम्या

बेलाच्या पानात लपलय लोकसंख्या रोखण्याचं ‘गुपित’, ‘कॅन्सर’ आणि ‘लिव्हर’साठी देखील फायदाच

#YogaDay2019 : मधुमेहाच्या रूग्णांसाठी वरदान आहे ‘मुद्रासन’

#YogaDay2019 : उंची वाढविण्यासाठी करा ‘ताडासन’