Coronavirus : ‘या’ राज्यात उघडली पहिली प्लाझ्मा बँक, ‘कोरोना’शी युद्ध जिंकण्यास होईल मदत

तेलंगणा : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूचा वाढत संसर्ग आणि त्याच्या उपचारात प्लाझ्माच्या प्रभावी उपचारानंतर तेलंगणामध्ये लोकांना मदत करण्यासाठी पहिली प्लाझ्मा बँक सुरू करण्यात आली आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री जी किशन रेड्डी यांनी प्लाझ्मा बँक सुरू केली. ही प्लाझ्मा बँक रोटरी क्लब, हैदराबादचा एक पुढाकार आहे.

प्लाझ्मा बँक सुरू झाल्यानंतर जी. किशन रेड्डी यांनी रोटरी क्लब, हैदराबादचे या योगदानाबद्दल आभार मानले आणि कोरोना व्हायरस लस येईपर्यंत प्लाझ्मा थेरपी ही रूग्णांसाठी एकमेव आशा असल्याचेही त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, “हैदराबादमध्ये आज पहिली प्लाझ्मा बँक स्थापन झाली आहे. आतापर्यंत कोरोना विषाणूची कोणतीही लस आली नाही, म्हणून प्रत्येक व्यक्तीने स्वत:ला विषाणूपासून वाचवावे. या विषाणूविरूद्ध लढण्यासाठी राज्यात अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत आणि ही प्लाझ्मा बँक त्यापैकी एक आहे.”

केंद्रीय मंत्री किशन रेड्डी यांनी कोरोना विषाणूचा पराभव केल्यानंतर जे पूर्णपणे बरे झाले त्यांना प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे येण्यास प्रोत्साहित केले. यातून येणाऱ्या अँटीबॉडीजमुळे बऱ्याच लोकांचा जीव वाचवण्यात मदत होईल. उद्घाटन सोहळ्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना किशन रेड्डी यांनी लोकांना सुरक्षित राहण्याचा आणि खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे.

केंद्रीय मंत्री रेड्डी म्हणाले की, आज एक महत्वाचा दिवस आहे कारण एकाच दिवसात विक्रमी १०,२५,००० चाचण्या घेण्यात आल्या. हे चांगले आहे पण आपण त्यापेक्षा अधिक चांगले केले पाहिजे. पंतप्रधान देशात व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सातत्याने सीएम आणि सर्व हितधारकांशी चर्चा करत आहेत. या विषाणूचा फैलाव दिल्लीत प्रभावीपणे रोखला गेला आहे. विषाणूचा प्रसार रोखण्यास हे एक यशस्वी मॉडेल असल्याचे सिद्ध झाले आहे.