हैदराबाद रेप केस : बलात्कार, हत्येचा पहिला ‘पुरावा’ पोलिसांच्या हाती

हैदराबाद : वृत्तसंस्था – महिला डॉक्टरावर सामुहिक बलात्कार करुन तिच्यावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याच्या घटनेतील पहिला पुरावा समोर आला आहे. महिला डॉक्टरला पेटवून देण्यासाठी तिच्यावर पेट्रोल टाकण्यासाठी त्यांनी ज्या पेट्रोल पंपावरुन पेट्रोल खरेदी केले. त्या पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही फुटेजचा व्हिडिओ पुढे आला आहे.

जोलु शिवा या पेट्रोल पंपावर मध्यरात्री १२ वाजून ५६ मिनिटांनी पेट्रोल खरेदी करण्यासाठी आला असल्याचे पंपावरील सीसीटीव्हीमध्ये दिसून येत आहे. या सीसीटीव्ही फुटेजच्यामार्फत पोलिसांना हैदराबाद सामुहिक बलात्कार व हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यास मदत झाली होती.

महिला डॉक्टरांवर सामुहिक बलात्कार केल्यानंतर चौघांनी तिच्यावर पेट्रोल टाकून जाळून टाकले होते. या सीसीटीव्हीच्या फुटेजमुळे पोलिसांनी चौघांना अटक केली होती. त्यांना शुक्रवारी पहाटे घटनास्थळी नेले असताना त्यांचा पोलिसांनी एन्काऊंटर केला होता. त्यावरुन एका बाजूला पोलिसांचे कौतुक होत असतानाच दुसरीकडे त्यांच्यावर टीकाही होत आहे. आपल्यावरील आरोपांना उत्तर देण्यासाठी पोलिसांनी हा व्हिडिओ प्रसिद्धी माध्यमांपर्यंत पोहचविला आहे.

Visit : Policenama.com