डोक फिरलया बया…पोलिसांच डोक फिरलया…चक्क वन्य प्राण्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा

नारायणगाव : पोलीसनामा ऑनलाईन – पोलिसांकडून गुन्हेगारांवर जबर बसावी यासाठी गुन्हा दाखल करण्यात येतो. मात्र, पुणे जिल्ह्यातील नारायणगाव पोलीस ठाण्यात एका बिबट्यावर गुन्हा(तक्रार) दाखल करण्यात आला आहे. बिबट्यावर गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

या बिबट्याने खानेवाडी येथील चार महिन्याच्या मुलीवर हल्ला केला होता. यामध्ये मुलीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात बिबट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बिबट्याला वन विभागाने पकडले आहे. त्यामुळे वन खात्याकडून त्या बिबट्याचा ताबा पोलीस घेणार का असा प्रश्न निर्माण होत आहे.

येडगाव हद्दीतील खानेवाडी येथे बिबट्याच्या हल्ह्यात चार महिन्याच्या कल्याणी सुखदेव झिटे हीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी कल्याणी हिचे नातेवाईक धोंडीभाऊ विठ्ठल झिटे (वय ३७, रा. जांबूत, ता. संगमनेर जि. अहमदनगर सध्या रा. नांदूर ता. संगमनेर जि. अहमदनगर) यांनी फिर्याद दिली आहे. नारायणगाव पोलिसांनी फिर्याद घेवून बुधवारी (दि. २३) गुन्हा दाखल केला आहे.

पोलिांनी दिलेल्या माहितीनुसार, येडगाव पसिरातील खानेवाडी येथे बुधवारी (दि. २३) पहाटे तीनच्या सुमारस कल्याणी ही शेतामध्ये मेढ्यांच्या पालामध्ये झोपली होती. यावेळी बिबट्याने तिला उचलून नेले. तीचा रडण्याचा आवाज आल्याने तिची आई जागी झाली. तीने आरडा ओरड करत बिबट्याचा पाठलाग केला. मात्र, बिबट्याने तिला चावल्याने तिचा मृत्यू झाला होता.

कल्याणीच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादेवरुन पोलिसांनी बिबट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल मोरे हे करीत आहेत.