11 वी च्या हजारो जागा शिल्‍लक असल्याने 500 शिक्षक अतिरिक्त !

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या राज्यात अतिरिक्त शिक्षकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. राज्यात अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. त्यानुसार राज्यातील सुमारे पंचवीस हजार जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील महाविद्यालयांमध्ये जवळपास पाचशे शिक्षक अतिरिक्त ठरणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्यावर्षी अतिरिक्त शिक्षकांचा हा आकडा शंभर होता.

यावर्षी अकरावीसाठी ५८ हजार २४० जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबवली गेली. त्यासाठी ३० हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केला आहे. मात्र प्रवेशाच्या दोन फेऱ्या झाल्या असून फक्त २० हजार ८२९ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. आता अकरावीच्या तिसऱ्या फेरीस उद्यापासून सुरुवात होणार आहे. त्यानंतर विशेष फेरी घेण्यात येईल.

साधारणत: महाविद्यालयांमध्ये १२० विद्यार्थ्यांना मिळून एक तुकडी बनवली जाते. या १२० विद्यार्थ्यांच्या एका तुकडीसाठी तीन शिक्षकांचा समावेश करण्यात येतो. मात्र, कला आणि वाणिज्य किंवा विज्ञान अशा संयुक्त शाखांचे महाविद्यालय असल्यास त्यांना साडेचार शिक्षकांची मान्यता मिळते. परंतु यंदा झालेल्या प्रवेश प्रक्रियेत कला शाखेत ९ हजार ४१६ जागा, वाणिज्य शाखेत १७ हजार ७४४ जागा तर विज्ञान शाखेत २७ हजार ६० अशा जागा आहेत. मात्र येथे अनुक्रमे १ हजार ५८१, वाणिज्य शाखेत ५ हजार १४४, तर विज्ञान शाखेत १३ हजार ८०५ जागांवर प्रवेश झाले आहेत. त्यामुळे तब्बल ३७ हजार ४११ जागा अद्याप रिक्त आहेत.

आता तिसरी होणार आहे, त्यानंतर विशेष फेरी घेण्यात येईल. ते प्रवेश झाले तरी त्यातील ३० हजार जागा रिक्त राहणार आहेत. त्यामुळे जवळपास २५० होणार नाहीत. त्यामुळे किमान पाचशे शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

आरोग्यविषयक वृत्त

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like