एल्गार परिषद : ‘त्या’ अर्जावर उद्या सुनावणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

माओवाद्यांशी संबंध असल्याच्या कारणावरून अटक करण्यात आलेल्या सुरेंद्र गडलिंग, शोमा सेन, महेश राऊत, रोना विल्सन, सुधिर ढवळे यांना रविवारी (दि.२) शिवाजीनगर न्यायालयात सुनावणी हाेणार आहे. अटक करण्यात आलेल्या पाच जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यासाठी ९० दिवसांची वाढ मिळावी यासाठी पुणे पोलिसांनी शनिवारी न्यायालयात अर्ज दाखल केला.
[amazon_link asins=’B01DDP7D6W’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’51512ffa-add3-11e8-b6a7-f5f281d03f0d’]

याबाबतची सुनावणी शनिवारी चार वाजता ठेवण्यात यावी अशी मागणी जिल्हा सरकारी वकील उज्वला पवार यांनी केली. परंतु, याला बचाव पक्षाचे वकील रोहन नहार आणि वकील राहुल देशमुख यांनी आरोपींना हा अर्ज अभ्यासण्यासाठी कालावधी मिळावा अशी मागणी न्यायालयाकडे केली. तसेच ही सुनावणी सोमवारी ठेवण्याची मागणी केली. परंतु याला अॅड. पवार यांनी विरोध करताना सोमवारी उच्च न्यायालयात या प्रकरणात सुनावणी असल्याने तपास अधिकाऱ्यांना उपस्थित राहणे शक्य नसल्याचे सांगितले. त्यावर सत्र न्यायाधीश के. डी. वडणे यांनी मधला मार्ग काढत या अर्जावरील सुनावणी रविवारी (दि. २) सकाळी १० वाजता ठेवली आहे.

पुण्यातील स्वारगेट परिसरात १२ लाखांचे ब्राउन शूगर जप्त 

सोमवारी या प्रकरणाला ९० दिवसांचा कालावधी पूर्ण होत असून आरोपपत्र दाखल करण्यास मुदत वाढ न मिळाल्यास जामिनासाठी अर्ज दाखल करून जामीन मिळविणे सोपे होईल. देशभर लक्ष लागून राहिलेल्या या प्रकरणाची सुनावणी सोमवारी होईल. या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यास मुदत वाढ मिळाल्यास जामिनासाठी फायदा मिळू शकणार नाही.

इतर बातम्या

माओवादी संघटनेशी सबंध असल्याच्या संशयावरुन , कवी वरवर राव यांना अटक

माओवादी संघटनेशी सबंध असल्याच्या संशयावरुन, देशभरातून  पाच जण अटकेत  

माओवादी समर्थकांविरोधात ठोस पुरावे : पोलीस महासंचालक सतीश माथूर

पुणे : हिंजवडीतून ५६ कंपन्यांनी स्थलांतर केल्याची चर्चा

मुख्याध्यापक मोदींना १,५०,००० लाच घेताना रंगेहाथ पकडले