‘फ्लिपकार्ड’च्या Big Shopping Days 2020 मध्ये विविध स्मार्टफोन्सवर आकर्षक ऑफर्स, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वॉलमार्टची मालकी असलेली ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर १९ मार्चपासून Big Shopping Days 2020 सेल सुरु करण्यात येणार आहे. हा सेल १९ ते २२ मार्चपर्यंत असणार आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन्स, टीव्ही, लॅपटॉप्स, स्पीकर्स आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर देखील मोठ्या प्रमाणात डिस्काउंट दिला जाणार आहे. तसेच एसबीआय क्रेडिट कार्ड वापरल्याने १० टक्के डिस्काउंट दिला जाणार आहे.

या सेलमध्ये स्मार्टफोन्सच्या किमतीत डिस्काउंट दिला जाणार आहे. या सेलमध्ये Redmi Note 7 Pro हा स्मार्टफोन ११ हजार ९९९ रुपयात खरेदी करता येणार आहे. तर Vivo Z1 Pro ची किंमत देखील ११ हजार ९९९ रुपये असणार आहे. तसेच या सेलमध्ये Samsung Galaxy S9 हा स्मार्टफोन २१ हजार ९९९ रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. तसेच या सेलमध्ये Realme 5 Pro हा स्मार्टफोन ११ हजार ९९९ रुपयांमध्ये मिळणार आहे, तर Samsung Galaxy A50 या स्मार्टफोनची किंमत १२ हजार ९९९ असणार आहे. तसेच यावर अनेक ऑफर्स देखील देण्यात येणार आहेत. तसेच या सेलमध्ये अ‍ॅपलचा iPhone XS 64GB ५२ हजार ९९९ रुपयांना मिळणार आहे.

तसेच या सेलमध्ये Oppo Reno 10x Zoom वर तब्बल १२ हजार रुपयांचा डिस्कांउट देण्यात येणार आहे. म्हणजेच डिस्काउंट वजा करता हा फोन आता फ्लिपकार्डच्या सेलमध्ये फक्त २४ हजार ९९० रुपयांना मिळणार आहे. तसेच Asus 6Z या सेलमध्ये २३ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येणार आहे. Google Pixel 3a चा 4GB+64GB स्मार्टफोन २६ हजार ९९९ रुपयात मिळणार असून Realme X2 Pro या स्मार्टफोनवर देखील ४ हजारांचा डिस्काउंट दिला जाणार आहे.