दौंडमध्ये पुराचे ‘थैमान’, पाणी दौंडमध्ये ‘शिरले’ ; मोठ्या प्रमाणावर जनजीवन ‘विस्कळीत’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन (अब्बास शेख) – धरणक्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुळा-मुठा आणि पर्यायाने भीमा नदी पात्रातील पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली आहे. दौंड शहरामध्ये पुराचे पाणी हे शिरले असून या पाण्यामुळे दौंड शहरातील खाटीक गल्ली आणि ईदगाह मैदान, नदीकाठी असणारी अनेक घरे, वीटभट्टया, आणि स्मशानभूमी पाण्याखाली गेली आहे. भीमा नदीला आलेल्या पुराचे पाणी मोठ्या प्रमाणावर शहरामध्ये शिरत असल्याने नागरिकांची दाणादान झाली असून पाण्यापासून बचावासाठी नागरिकांनी स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे.
Daund1
नदीला आलेल्या पुरामुळे दौंड तालुक्यातील सर्वच कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे आणि दौंड- शिरूर तालुक्याला जोडणारे अनेक पूल पाण्याखाली गेल्याने अनेक गावांसह तालुक्यांचाही संपर्क तुटला आहे. दौंड तालुक्यातील नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Daund-3
धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पावसाचा जोर वाढला आहे. यामुळे मुळा-मुठा आणि पर्यायानेच भीमा नदी पात्रात सातत्याने पाण्याचा विसर्ग वाढत आहे. मुळा-मुठासह भीमा नदीने धोकादायक स्थिती ओलांडली असून सर्वच बंधारे पाण्याखाली गेले आहेत. नानगाव, कानगाव या ठिकाणी भीमा नदीवर नव्याने उभारण्यात आलेल्या पुल पाण्याखाली गेले असून राहू, दहिटणे, खामगाव या गावांना जोडणारे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली गेल्याने गावांचा संपर्क तुटला आहे.
Daund-4
राहू-पिंपळगाव यांना जोडणारा बंधाराही पाण्याखाली गेला आहे. राहू गावाला जोडणाऱ्या मोठ्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने सावधगिरी बाळगत तेथील वाहतूक बंद करण्यात आली आहे. पुलावरून पाणी वाहू लागल्याने राहू आणि पिंपळगावचा संपर्क तुटला आहे. मुळा मुठा या नद्यांचा जेथे संगम होऊन पुढे त्याचे भीमा नदीमध्ये रूपांतर होते तो संगम येथील पूल ही पाण्याखाली गेल्याने देलवडी-वाळकी या गावांचा संपर्क तुटला आहे. संगमाच्या पुढे नदीचे पात्र मोठ्या प्रमाणावर विस्तारल्याने पाण्याचा प्रवाह मोठा झाला असून पारगावच्या पुढील सर्व बंधारे आणि अनेक गावांना जोडणारे पूल पाण्याखाली गेले आहेत.
Daund-5
याबाबत दौंडचे तहसीलदार बालाजी सोमवंशी यांनी लेखी स्वरूपामध्ये नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून प्रशासनाकडून नागरिकांची पर्यायी व्यवस्था करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरु करण्यात आहेत.
Daund-6

Daund-7

आरोग्यविषयक वृत्त