पूरस्थितीनंतर तीन महिन्यांनी प्रशासन सुस्तच, महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केली ‘नाराजी’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील आंबिल ओढ्याला आलेल्या पुराचे भग्न अवशेष अजून सुध्दा ओढ्यात तसेच आहेत. वाहने, साहित्य, कचरा आणि गाड्या ओढ्यातून काढल्याच गेल्या नाहीत. एवढेच काय तर पूरामध्ये मरण पावलेल्या जनावरांचे अवशेषही अद्याप ओढ्यातच आहेत. पूरामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असतानाही प्रशासनाच्या कामाला गती येत नसून पूरग्रस्तांचे प्रश्‍नही सुटलेले नाहीत, याबद्दल महापौर मुरलीधर मोहोळ यांनी नाराजी व्यक्त केली. एवढेच नव्हे ओढ्यामुळे बाधित झालेल्या आणि ओढ्याच्या कडेला धोकादायक परिस्थितीत राहाणार्‍या सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांना नुकसान भरपाईसोबतच कायम स्वरूपी सुरक्षित निवारा मिळावा यासाठी योजना तयार करावी, अशी सूचना प्रशासनाला दिली.

Murlidhar Mohol

पावसाळ्यामध्ये २५ सप्टेंबरला रात्री आंबिल ओढ्याला आलेल्या पूरानंतरच्या परिस्थितीची आज नवनिर्वाचित महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पाहाणी केली. सकाळी साडेदहा वाजता कात्रज येथील नानासाहेब पेशवे तलावापासून या पाहाणीला सुरूवात झाली. याप्रसंगी उपमहापौर सरस्वती शेंडगे, सभागृहनेते धीरज घाटे, मनसेचे गटनेते वसंत मोरे, माजी महापौर व नगरसेवक दत्तात्रय धनकवडे, उपमहापौर आबा बागुल, स्थानीक नगरसेवक प्रकाश कदम, राणी भोसले, मनीषा कदम, महापालिका आयुक्त सौरभ राव, शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्यासह सर्वच विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. तसेच शिवदर्शन येथील पाहाणी दरम्यान स्थानीक नगरसेविका अश्‍विनी कदम, महेश वाबळे आदी उपस्थित होते.

या पाहाणी दौर्‍यानंतर पत्रकारांना माहिती देताना मोहोळ यांनी पूरस्थितीनंतरही तीन महिन्यांनी प्रशासनाने फारशी कामे न केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. अनेक ठिकाणी ओढ्यामध्ये गाड्या, वाहून आलेले साहित्य अद्याप आहे तसेच आहे. ओढ्यामध्ये मरण पावलेली जनावरी सुध्दा काढण्यात आली नाहीत. त्यामुळे प्रशासनाने केलेले कामावर आपण समाधानी नसल्याचे मोहळ यांनी सांगितले.

Murlidhar Mohol

ओढ्यावर असलेल्या काही पुलांची उंची वाढवण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे ही कामे तात्काळ करण्याची गरज आहे. ओढ्याला कोणत्या कारणामुळे पुर आला याचा अभ्यास महापालिका प्रशासनाने केलेला आहे. यामध्ये पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण झाल्यामुळे अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे याठिकाणी करावयाच्या उपाययोजनांची माहिती घेतली. अनेक ठिकाणी सीमाभिंत पडल्या आहेत. त्यादुरुस्त करण्याची आवश्यकता आहे. ओढ्यावर काही ठिकाणी अतिक्रमणे आहेत ही अतिक्रमणे काढण्यात यावीत अशा सुचना प्रशासनाला दिल्या आहेत.

टांगलेवाला वसाहत याठिकाणी जीवितहानी झाली होती. याठिकाणच्या नागरिकांच्या पुर्नवसनाचा प्रश्न आहे. शेजारी असलेल्या मोकळ्या जागेत आरक्षणात बदल करुन पुर्नवसन करावे लागणार आहे. याबाबातच्या सुचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत असे मोहळ यांनी सांगितले. तसेच आंबिल ओढा येथील नागरिक ज्यांची घरे वाहून गेली, ते नागरिक अद्याप शाळेतच राहात आहेत. त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अद्याप मदत मिळालेली नाही. या नागरिकांचे तात्पुरत्या स्वरूपात त्याच ठिकाणी पुनर्वसन करावे. तसेच त्यांना महापालिकेच्या अन्य योजनेतून कायमस्वरूपी घरे उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने नियोजन करावे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून त्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी पाठपुरावा करणार आहोत, असेही मोहोळ यांनी नमूद केले.

murlidhar Mohol

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/