अरे देवा ! वीज पडून ‘या’ दिग्गज खेळाडूंचा स्टेडियमवरच मृत्यू

धनबाद : वृत्तसंस्था – स्टेडीयमवर खेळाडूंना प्रशिक्षण देत असताना अचानक पावसाला सुरुवात झाली. मैदानावर मुलांना फुटबॉलचे धडे देत असताना अचानक एक वीज कडाडली आणि मैदानावर कोसळली. यावेळी मुलांना फुटबॉलचे धडे देणारे दिग्गज कोच आणि खेळाडू अभिजीत गांगुली याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज शहरातील प्रसिद्ध बिरसा मुंडा स्टेडियमवर घडली. या घटनेमुळे क्रिडा क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
Abhijit ganguly
अभिजीत गांगुली हे माजी संतोष ट्रॉफी खेळाडू आहेत. गांगुली हे मुलं आणि मुलींना मैदानावर प्रशिक्षण देत असतानाच ही दुर्दैवी घटना घडली. ते नियमित या मैदानावर मुलांना फुटबॉलचे धडे देत होते. गांगुली हे धनबाद रेल्वे विभागाचे कोच होते. गांगुली यांनी झारखंडमधून अनेक फुटबॉलपटू निर्माण केले होते. या खळाडूंनी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर उत्तम कामगिरी केली होती. गांगुली हे दररोजच्या प्रमाणे आज सकाळी मैदानावर आले होते. सराव सुरु असताना पावसाला सुरुवात झाली. पाऊस सुरु असतानाही मैदानावर सराव सुरु होता. त्याचवेळी ही दुर्दैवी घटना घडली.

गांगुली हे विद्यार्थ्यांना फुटबॉलचे धडे देत असतानाच एक वीज कडाडली आणि मैदानात कोसळली. त्यात गांगुली यांच्यासह काही खेळाडू सापडले. यावेळी त्यांच्यासोबत मैदानात राष्ट्रीय फुटबॉलपटू लाल हेम्ब्राम आणि चंदन टुडू हेही होते मात्र त्यातून सुदैवाने ते बचावले. गांगुली हे बेशुद्ध झाल्याने त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले. त्यांनी 1993 मध्ये संतोष ट्रॉफी राष्ट्रीय फुटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत बिहारचे प्रतिनिधित्व केले होते.

visit : Policenama.com