‘ही’ महिला आहे SEX WORKER, पती आणि मुलीचाही तिला SUPPORT

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – तु्म्ही अशा सेक्स वर्करविषयी कधी ऐकले आहे का, की तिचे लग्न झाले आहे शिवाय ती लग्नानंतरही आपला सेक्स वर्करचा जॉब करत आहे. असा कोणता पती आहे की ज्याला आपली बायको सेक्स वर्करचे काम करते हे आवडेल ? कदाचित असा पती शोधूनही सापडणार नाही.

परंतु अशा सेक्सवर्कर बद्दल आणि अशा पतीबद्दल आपण जाणून घेणार आहोत. आम्ही सांगत आहोत ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध सेक्स वर्कर ईवा स्लेसबद्दल. ईवा एक विवाहीत असून तिच्या लग्नाला तब्बल 10 वर्ष झाले आहेत. आश्चर्यकारक म्हणजे लग्नानंतरही ईवा सेक्स वर्करचे काम करत आहे. ईवाचा पती जस्टीनला तिच्या सेक्स वर्करच्या कामाची काहीही अडचण नाही. तो कधीच तिला हे काम करण्यापासून अडवत नाही.

ईवा या सगळ्याबद्दल बोलताना सांगते की, “माझ्यासाठी सेक्स करणं ही एन्जॉय करण्याची गोष्ट नाही तर हा एक जॉब आहे जो मी करत आहे. माझ्यासाठी सेक्स करणं ही एक नोकरीच आहे.” ईवा सेक्सशी निगडीत बाबींवर वर्तमानपत्र आणि मासिकांत लिहत असते. याशिवाय ती तरुणांना सेक्स एज्युकेशनदेखील देते. ईवाचा पती या सगळ्यासाठी तिला सपोर्ट करतो, तिला कधीच अडवत नाही. ईवा सांगते की, तिचे आणि पतीचे नाते विश्वास, दोस्ती आणि प्रेमावर आधारीत आहे.

ईवाचा पतीही तिच्या या वक्तव्याशी सहमत आहे. या दोघांना एक मुलगीही आहे जिचे वय 14 वर्ष आहे. विशेष बाब अशी की, ईवाच्या मुलीलाही तिच्याबद्दल सर्व काही माहिती आहे. असे असले तरी ती केवळ आपल्या अभ्यासावर फोकस करताना दिसते. ईवा गेल्या 15 वर्षांपासून सेक्स वर्करचे काम करत आहे. याशिवाय तिने एका वेश्यालयाची मॅनेजर आणि केअरेटकर म्हणूनही काम पाहिले आहे. खरंच ही प्रेमकहाणी काही औरच आहे.

 

You might also like