पाबळ मध्ये जबरी चोरी, महिला जखमी

शिक्रापुर : प्रतिनिधी –  दरवाज्यावर टक टक असा आवाज आला आणि आपला नातू कामावरून आला असेल या आशेने आजी ने दार उघडताच अज्ञात व्यक्तीने आजीच्या गळ्यातील सोन्याचा गंठन ओरबडण्याचा प्रयत्न केला हा संपूर्ण प्रकार एक मे रात्री दोन च्या सुमारास पाबळ येथील जमदाडे मळा या वस्तीवर घडला, या मध्ये दोन महिला जखमी असून एक महिला भोसरी येथील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे तर एका महिलेस किरकोळ दुखापत झाल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली

या जबरी चोरी ची माहिती शिक्रापूर पोलीसांनी घटना स्थळी धाव घेतली असता, सुमारे एक तोळ्यांचा गंठनं, कंबरेला असणाऱ्या पिशवीतील रोख रक्कम रुपये तीन हजार व घरातील कपडे आणि इतर साहित्य अशी एकूण अंदाजे 28 हजार इतका मुद्देमाल दोन अज्ञात चोरट्यांनी चोरला असल्याची माहिती मिळाली असून शिक्रापूर पोलीस ठाण्यात दोन अज्ञात व्यक्तीच्या विरोधात 394, 397 व 34 कलमातर्गत गुन्हा नोंद केला
घटनास्थळी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह श्वानपथक देखील पाचारण करण्यात आले होते यावेळी दौंडचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश धस, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे,पोलीस उपनिरीक्षक व्ही एन साळुंके यांनी धाव घेऊन घटनास्थळाची पाहणी केली, याबाबत अधिक तपास उपनिरीक्षक साळुंके हे करत आहेत