व्हायरल झाली ‘हिंदी-पंजाबी’ बोलणारी ‘विदेशी भाभी’, बनली ‘TikTok’ स्टार (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाईन टीम – एक परदेशी महिला सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. खास बात अशी की, ही महिला पंजाबी आणि हिंदी बोलते. सध्या सोशल मीडियावर या महिलेची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

या महिलेचे टिकटॉक व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहते तिला विदेशी भाभी म्हणत आहेत. ती महिला छान पंजाबी भाषा तर बोलतेच. परंतु मोडकं तोडकं हिंदी बोलण्याचाही तिचा प्रयत्न असतो आणि ती बोलतेही.

@themodernsinghs नावाच्या टिकटॉक प्रोफाईलवरून ही महिला सतत व्हिडीओ अपलोड करताना दिसत असते. तिचा पती पंजाबी असून तो तिला पंजाबी बोलायला शिकवताना दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सदर महिला ही स्कॉटलंडची आहे तर तिचा पती हा पंजाबी आहे. दोघांनीही पंजाबी रितीरीवाजानं लग्न केलं आहे. त्यांनी त्यांच्या घरी पार पडलेल्या त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओदेखील शेअर केले आहेत. सध्या त्यांचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

काही व्हिडीओत दिसत आहे की, तिचा पती आपल्या परदेशी पत्नीला पंजाबी बोलायला शिकवत आहे. काही व्हिडीओत ती जेवण बनवतानाही दिसत आहे. या महिलेचं नाव बेबी सिंह आहे असं सांगितलं जात आहे. कारण तिचा पती अनेक व्हिडीओत तिला बेबी सिंह म्हणून हाक मारत आहे. काही व्हिडीओत ती हिंदी शिकताना दिसत आहे. तुम ही हो हे गाणंही तिनं गायलं आहे.