तीर्थक्षेत्र जेजुरी येथे विदेशी कुटुंबाने केला ‘कुलधर्म कुलाचार’ !

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) – तीर्थक्षेत्र जेजुरी येथे विदेशी कुटुंबाने सहपरिवार कुलधर्म कुलाचार केला. अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेले तीर्थक्षेत्र जेजुरी हे आता देश विदेशातही प्रसिद्ध होत असल्याचे दिसत आहे. देश-विदेशातही खंडोबाचे भक्त पाहायला मिळत आहेत.

जेजुरी मध्ये येऊन ते आपला कुलधर्म कुलाचार करत आहेत. मागील काही दिवसांमध्ये मॉरिशस येथील एका खंडोबा भक्ताने जेजुरी येथे आपल्या परिवारासह कुलधर्म कुलाचार केल्याचं पहायला मिळाले होते.
विदेशी कुटूंबाने भंडारा, खोबरे उधळून तसेच तळी-भंडारा उचलून आणि येळकोट येळकोट जय मल्हार नामाचा गजरात त्यांनी खंडोबा देवाचे दर्शन घेतले.

आपल्या कुळाचे रक्षण आणि उद्धार व्हावा म्हणून कुलधर्म कुलाचार केला जात असतो, येथील रितीरिवाजाप्रमाणे विदेशी कुटुंबाने आपला कुलधर्म कुलाचार केल्याचं पाहिला दिसून आले.