नवीन वर्षात दारू महागणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – थर्टी फस्टला मद्य प्राशन करून नव्या वर्षाचे स्वागत करणाऱ्या तळीरामांसाठी नवे वर्ष मात्र बॅड न्यूज घेऊन आले आहे. नव्या वर्षात विदेशी ब्रँडच्या दारूला उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने शुल्क वाढीचे निर्देश दिले असल्याने ते अतिरिक्त शुल्क सामान्यांच्या खरेदीतून भरून काढले जाताना आहे. म्हणून आता विदेशी ब्रँडची दारू महाग होणार आहे. या अतिरिक्त शुल्का मधून सरकारच्या तिजोरीत ५०० कोटींची भर पडणार आहे.

राज्य सरकारने आरंभलेल्या कल्याणकारी योजनांच्या पूर्ततेसाठी सरकारच्या तिजोरीत रक्कम नसल्याने सध्या सरकारला आर्थिक चणचणीचा सामना करावा लागत आहे. म्हणून उतपन्नाचे स्त्रोत वाढवण्यासाठी सरकार प्रयत्न केट आहे. त्यातूनच सरकारने हि कार्यवाही केली आहे. सरकारने राज्यातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन अयोग लागू केला आहे म्हणून सरकारच्या तिजोरीवर वार्षिक २४ हजार ४८५ कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. म्हणून सरकारने आपले उत्पन्न वाढवण्याचा घाट घातला आहे त्यामुळे याचा पहिला फटका तळीरामांना बसला आहे. कारण आता दारू महाग होणार आहे.

विदेशी बँडच्या दारूवर सरकारने उत्पादक शुल्क वाढ केल्याने आता  दारू पिणाऱ्यांच्या सरकारने तोंडचे पाणी पळवले आहे. विदेशी दारूच्या ब्रँडवर आता १८ ते २० टक्के शुल्क आकारले जाणार असून राज्य सरकारच्या महसुलात वर्षाला ५०० कोटींची रुपयांची वाढ होणार आहे. या बाबतचे वृत्त आज येऊन धडकल्याने तळीरामांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. मात्र भारतात उत्पादन होणाऱ्या मद्याच्या बँड वर कसले ही अतिरिक्त उत्पादन शुल्क लावण्यात आले नाही म्हणून देशी ब्रँडच्या दारूत कसलीही दर वाढ होणार नाही.