‘त्या’ माजी महिला आयपीएस अधिकाऱ्याचा भाजपमध्ये प्रवेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या काही दिवसांपासून माजी आयपीएस अधिकारी भारती घोष भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती. परंतु याच चर्चेला आता पूर्ण विराम मिळाला आहे. पश्चिम बंगालच्या माजी आयपीएस अधिकारी भारती घोष यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, भाजपचे महासचिव कैलास विजयवर्गीय यांच्या प्रमुख उपस्थिती घोष यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

माजी आयपीएस अधिकारी भारती घोष एकेकाळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या खूप जवळ होत्या. त्यांच्यावर अधिक संपत्ती असल्याचा आरोप होता. मागील काही काळाापसून भारती यांना शोधण्या साठी सीआयडीने देशभरात छापेमारी सुरू केली होती. २९ डिसेंबर २०१७ ला भारती घोष यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर त्याच्या भाजपमध्ये प्रवेश करण्याबाबतच्या चर्चेला उधाण आले होते. दरम्यान आज त्या चर्चेला भारती यांनी पूर्ण विराम दिला आहे. आज त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

Loading...
You might also like